Housefull 5 | ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे आतापर्यंत चार भाग प्रदर्शित झाले आहे. यानंतर ‘हाऊसफुल 5’ची घोषणा केल्यापासून चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या चारही भागांमधील कास्टिंग नेहमीच चर्चेत राहली आहे. आता पाचव्या भागात देखील रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे. या भागातही अनेक कलाकार मंडळी दिसणार आहे.
अशात निर्माता साजिद नाडियाडवालाने हाऊसफुल 5 मधून चाहत्यांना खास अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा हाऊसफुल 5 हा चित्रपट आता लंडनच्या सुंदर ठिकाणी आणि उत्कृष्ट VFX सह बनवला जात आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळतील, असे दिसते आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे.
नाडियादवालाने सोशल मीडियावर पोस्ट करून हाऊसफुल 5 चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. हाऊसफुल 5 च्या टीमचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हाऊसफुल 5 ची टीम त्यांच्या क्रूझवर उपस्थित आहे. हशा, मनोरंजन आणि वेडेपणाच्या सर्वात मोठ्या लाटेसाठी सज्ज व्हा. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट तरुण मनसुखानी दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. अक्षय कुमारसोबत अभिषेक बच्चन, चित्रांगदा सिंग, संजय दत्त, फरदीन खान, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, चंकी पांडे, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, रणजीत, दिनो मोरिया आणि सौंदर्या शर्मा दिसणार आहेत. .
‘हाऊसफुल’ ही एक लोकप्रिय फ्रेंचाइजी आहे. त्याचे चार चित्रपट प्रदर्शित झाले असून आता पाचव्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. पहिला चित्रपट 2010 मध्ये आला होता. अक्षय कुमार आणि रितेश देशमुख आत्तापर्यंत सर्वच चित्रपटांचा भाग आहेत. आता या फ्रँचायझीच्या पाचव्या हप्त्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चंकी पांडेच्या पोस्टवर प्रेक्षक मजेशीर कमेंट करत आहेत.
=================