HOUSE TOUR: असे आहे डी-मार्टच्या राधाकृष्णन दमानी यांचे अलिशान घर 

मुंबई – मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून प्रसिद्ध असलेले आणि डीमार्ट या देशभर पसरलेल्या रिटेल चेनचे मालक राधाकृष्णन दमानी यांनी बंपर खरेदी केली आहे. त्यांनी मुंबईत तब्बल 1 हजार कोटी रुपयांचं घर खेरदी केलं आहे. मुंबईतील हायप्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मलबार हिल येथील घराची त्यांनी खरेदी केली आहे.

दमानी यांनी खेरदी केलेल्या घराचं क्षेत्रफळ 5752. 22 स्केवर फूट असून त्याची किंमत बाजार भावानुसार 724 कोटी रुपये आहेत. मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या अलिशान एरियात हा मोठा प्लॉट आहे. पुराचंद रॉयचंद अँड सन्स, परेशचंद रॉयचंद अँड सन्स आणि प्रेमचंद रॉयचंद सन्स या तिघांकडून दमानी आणि त्यांच्या भावाने हे घर खेरदी केले आहे. या घराच्या खरेदीसाठी तब्बल 30 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लागली आहे.

90 वर्षांहून अधिक जुना 5752.22 चौरस मीटर क्षेत्रावर वसलेल्या ‘मधुकुंज’ बंगल्याची ग्राऊण्ड प्लस वन अर्थात एकमजली रचना आहे. हा बंगला 90 वर्षांहून अधिक जुना असल्याचा अंदाज बांधला जातो. नारायण दाभोळकर मार्गाच्या कोपऱ्यावर हा बंगला आहे. या बंगल्याला ओपन टेरेस आणि विस्तीर्ण मोकळा भाग आहे. शिवगिरी, रामटेक, मेघदूत यासारखे व्हीआयपी बंगलेही याच परिसरात आहेत.

मूळ मालक प्रेमचंद रॉयचंद : ‘मधुकुंज’ बंगल्याचे मूळ मालक प्रेमचंद रॉयचंद यांचे कुटुंबीय आहेत. या व्यापारी कुटुंबानेच मुंबईला राजाबाई टॉवर भेट दिला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची स्थापना करणाऱ्या प्रेमचंद यांनी मातोश्री राजाबाईंचे नाव टॉवरला देण्याची अट घातली होती.

डिमार्टच्या माध्यमातून एव्हुन्यू सुपरमार्केट या देशभर पसरलेल्या रिटेलर शॉपचे दमानी मालक आहेत. फोर्ब्स इंडियाच्या 2020 मधील गर्भश्रीमंत लोकांच्या यादीत दमानी यांचं नाव असून त्यांची संपत्ती 15.4 बिलियन्स डॉलर एवढी आहे. दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. ते शेअर बाजारातील जानकार आणि गुंतवणूकदार आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.