#video: हायवेवर उभे राहून कोल्हे यांची सभा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात प्रचार सभा होती. पण, प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आल्याने या प्रचार सभांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

चोपडा पाईट, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या ठिकाणी सभा आयोजित करण्यात होती. परंतू, केवळ पुणे परिसरात मोदींची सभा असल्याने जाणीवपूर्वक उड्डाण परवानग्या नाकारल्या गेल्या. देशाचे पंतप्रधान जर एका पक्षाच्या प्रचारासाठी येत असतील तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवणं कितपत बरोबर आहे, हे किती लोकशाहीच्या मुल्यांना धरून आहे, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द केल्यानंतर अमोल कोल्हेंनी अनोख्या पद्धतीने सभेला उपस्थित राहत भाषण देखील केले. भोसरी आणि चिंचवडमध्ये होत असलेल्या या सभेला कोल्हेंनी चांदवड-नाशिक रोडच्या कडेला उभे राहत फोनवरुन संबोधित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.