पुणे – कोकणातील पूरग्रस्तांना पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पेठमाप येथील नागरिकांना ही मदत देण्यात आली.
कोकणातील अनेक भागामध्ये पुराचा मोठा फटका बसलेला आहे. अनेक गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. या नागरिकांना मदत म्हणून पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा ‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून पालिकेतील सभागृह नेते बिडकर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची आवश्यक असलेली मदत शनिवारी रत्नागिरी येथे पाठविण्यात आली.
साड्या, टॉवेल, कपडे, ताटे, वाट्या, ग्लास, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बॅग याबरोबरच तांदूळ, डाळ, पीठ, तेल, बिस्किटांचे पुडे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले किट यांचा समावेश यामध्ये होता. कोकणवासीयांना आवश्यक असलेली मदत करण्यासाठी यापुढील काळात देखील अशा पद्धतीने साहित्य पाठविले जाणार असल्याचे सभागृहनेते बिडकर यांनी सांगितले.
या उपक्रमामध्ये विशाल दरेकर, प्रकाश नारंग, जयदीप कुटियान, हर्षल दिघे, माऊली शिवले, गौरी गणेश बिडकर, वैशाली सोनवणे, सुरेखा शिंदे, उज्जवला गौड, संगीता सावंत, अनु तळेगावकर, सुवर्णा भरेकर यांच्यासह राजेश पौडवाल, सुमित रांबाडे, राजाभाऊ नरवडे, मच्छिंद्र जाधव, निलेश राऊत, योगेश होले, उद्धव मराठे, भगवानसिंग राजपुरोहित, शौनक जांभुळकर, सोमनाथ शेळके, दिलीपमामा बहिरट, विशाल ओझा, अजय पांचाळ, हणमंत लोंढे, रमेश पुजारी, सुनील पहुजा, गणेश निम्हण, सुरज दुबे, रमेश तिकोने, रमेश पुजारी, प्रसाद कांबळे, संजय नाईक, किरण जगताप, अतुल नाईक, रवी जाधव यांनी सहभाग घेतला.