मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
करिश्मा तन्नाने (Karishma Tanna) नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, यामध्ये करिश्मा अतिशय बोल्ड अँड ग्लॅमर्स दिसत आहे. करिश्माचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये करिश्मा (Karishma Tanna) बेडवर बसून पोझेस देताना दिसत आहे. तिच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
करिश्माने, ‘वीकेंड मूड’ असे कॅप्शन या फोटोसोबत लिहिले आहे. करिश्मा तन्ना (Karishma Tanna) कोणत्याही लुकमध्ये स्टायलिश, बोल्ड आणि सुंदर दिसते.
करिश्माने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली नागीन या मालिकेतील तिच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले आहे.
करिश्माने (Karishma Tanna) ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’, ‘नागार्जुन: एक योद्धा’, ‘कयामत की रात’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेता रणबीर कपूरच्या संजू या चित्रपटात सुद्धा करिश्माने मुख्य भूमिका साकारली होती.