पुणे: हॉटफूट स्पोर्टस अकादमी तर्फे आयोजित पाचव्या वर्षी अपोलो हॉटफूट युवा साखळी आंतर अकादमी फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेच्या 8 आणि 14 वर्षाखालील गटात 4 लायन्स् अकादमी, नाझ फुटबॉल अकादमी अ आणि दिएगो ज्युनिअर फुटबॉल क्लब अ या संघांनी विजयांची हॅट्ट्रिक नोंदविली.
या स्पर्धेच्या 8 वर्षाखालील गटात नाझ अ संघाने सलग तीन विजयांची नोंद केली. नाझने फन फिटनेस संघाचा 7-0 असा सहज पराभव केला. दुसऱ्या सामन्यात नाझ संघाने दिएगो ज्युनिअर एफसी ब संघाचा 17-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात नाझ अ संघाने नाझ ब संघाचा 12-0 असा धुव्वा उडविला. नाझ संघाच्या फरहान शेख याने 5 गोल मारले. याच गटात 4 लायन्स् अकादमीने सलग तीन विजयांची नोंद केली.
पहिल्या सामन्यात 4 लायन्स् संघाने अरेना स्पोर्टस् अकादमीचा 7-1 असा सहज पराभव केला. दुसऱ्या सामन्यात प्रभुगन सासन व विहान बेविनारद यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर 4 लायन्स् अकादमीने फन फिटनेस संघाचा 2-1 असा सहज पराभव केला. तिसऱ्या सामन्यात 4 लायन्स् अकादमीने नाझ ब संघाचा 6-0 असा सहज पराभव केला. 14 वर्षाखालील गटात 4 लायन्स्ने सलग तीन विजयांची नोंद केली.
पहिल्या सामन्यात 4 लायन्सप संघाने दिएगो ज्युनिअर फुटबॉल अकादमी ब संघाचा 5-2 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात निशांत हेगडे व साहील खरे यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर 4 लायन्स् अकादमीने इंदिरा अकादमीचा 2-0 असा सहज पराभव केला.