नोरा फतेहीचा इंस्टाग्रामवर ग्लॅमरस अवतारात हॉटनेसचा जलवा

नोरा फतेही लवकरच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये दिसणार आहे. नोरा फतेही दररोज वेगवेगळ्या अवतारामध्ये दिसते. नुकतंच तिनं एक फोटोशूट केलं आहे ज्यामध्ये ती बेस्पोक वाइन रेड गाऊनमध्ये दिसली आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

या रेड गाऊनमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा रेड गाऊन ब्रिटिश वूमनस्वेअर लेबलकडून घेतला आहे, ज्याची किंमत 51 हजार रुपये आहे.

नोरा फतेहीचे हे फोटो इंस्टाग्राम व सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत.

 

नोराचे हे फोटो साशा जयराम यांनी क्लिक केले आहेत. सेलिब्रिटी स्टायलिस्ट चांदनी वाही, हेअरस्टाइलिस्ट मार्क पेड्रोजो आणि मेक-अप सावलीन कौर मनचंदानानं केलं आहे. या सगळ्यांनी मिळून तिचा लूक परिपूर्ण केला आहे.

नोरा फतेही लवकरच ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.