नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांच्या निधीतून विकासकाम
कोंढवा – कोंढवा खुर्द प्रभाग क्रमांक 27 मध्ये महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेविका परवीन हाजी फिरोज व नगरसेविका हमीदा अनीस सुंडके यांच्या निधीतून मल्टी-स्पेशालिटी प्रसूतीगृह हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. सदर काम वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांनी सांगितले.
येथे उभारण्यात येत असलेल्या हॉस्पिटल्या कामाची पाहणी करताना त्यांनी वरील माहिती दिली. हॉस्पिटलच्या तळाची फुटिंग भरण्यात आली असून पिलर उभे करण्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे. या कामाची पाहणी नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांच्यासह माजी नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज शेख, इरफान भाई, जाबिर भाई आणि अमजद पठाण यांनी केली.
सदर काम वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न असून त्यासंदर्भात संबंधीत ठेकेदार, अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असल्याचे नगरसेविका परवीन हाजी फिरोज यांनी सांगितले. कोंढवा-मिठानगर प्रभाग क्र.27 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या होत्या, या समस्या मार्गी लावण्यासाठी नगरसेविका हाजी परवीन शेख व हामिदा सुंडके यांनी सातत्याने पाठपुरावा करुन अनेक उपक्रम व योजना राबविल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सोयीसुविधा पुरविण्याकरिता सातत्याने प्रयत्न राहतील, असे ऑल कोंढवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख यांनी सांगितले.