पुणे येथे 25 जुलैपासून अश्‍वशर्यती

-अशोक कांगले

पुणे – पुणे 2019 चा अश्‍वशर्यतीचा हंगाम तीन महिन्यांचा आहे. या हंगामात 23 दिवस अश्‍वशर्यती होतील. त्यामध्ये 13 रेग्युलर शर्यती आणि 10 स्पेशल रेस डे चा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी डी. के. आशिष ट्रॉफी या महत्त्वाच्या रेसने सुरुवात होत असून 26 ऑक्‍टोबर या शेवटच्या दिवशी आरडब्ल्यूआयटीसी गोल्ड कप या मुख्य रेसने सिझनची सांगता होईल.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे संपूर्ण रेस कोर्सचा परिसर हिरवागार झाला आहे. तसेच पुणे रेसकोर्सची धावपट्टी कमीत कमी खर्चात उत्कृष्ट बनविली आहे. रोज सराव करण्याची रेतीची धावपट्टीही व्यवस्थितरित्या तयार करण्यात आली आहे. पुणे रेसकोर्सवर जवळ जवळ 900 घोडे दाखल झाले आहेत. त्यामध्ये 2 वर्षे वयाच्या घोड्यांचा समावेश आहे. 37 अश्‍व शिक्षक या घोड्यांचा सराव करून घेत आहेत. या घोड्यांना सराव देण्यासाठी जवळ जवळ 100 जॉकी (अपरेंटिस बॉईज आणि रायडिंग बॉईज धरून) आपल्या कामात मग्न आहेत.

पुणे सिझनमध्ये ट्रेनर पी. श्रॉफ, एस. के. सुंदरजी, एम्तियाज सेठ आणि दलीकस तोडीवाला हे आपले जास्तीत जास्त घोडे जिंकविण्याचा प्रयत्न करतील. जॉकीजपैकी पी. ट्रेव्हर, संदेश आखाडे, निरज रावल, झरवाण यांचे घोडे खेळणे पंटर्सला फायद्याचे ठरेल. पुणे सिझनमध्ये 2 वर्षे वयाच्या घोड्यांची प्रुडेन्शिअल चॅम्प ट्रॉफी ही एकच अश्‍वशर्यत ठेवली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)