खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 9 जखमी

बसमधील क्लीनरचा मृत्यू, 9 जखमी

पिंपरी – उदगीर ते मुंबई जाणारी खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसमधील क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ झाला.

बजरंग गायकवाड (वय अंदाजे 35) असे अपघातात मृत्यू झालेल्या क्लीनरचे नाव आहे. नऊ जखमी प्रवाशांपैकी सहा जणांना औंध रुग्णालयात तर तीन प्रवाशांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

वनिता ट्रॅव्हल्स कंपनीची बस उदगीर येथून मुंबईला चालली होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ बस आणि मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर 4 वाजून 46 मिनिटांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली.

मुख्य अग्निशमन विभागाचा एक आणि रहाटणी उपविभागाचा एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.