नारायणगाव : पुणे -नाशिक महामार्गावरील नारायणगाव याठिकाणी मुक्ताई धाब्याच्या जवळ एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी नऊच्या सुमारास नाशिक महाबळेश्वर एसटी बस बिघडल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी प्रवासी वाहतूक करणारी मिक्सीमो गाडी नारायणगावच्या दिशेने येत असताना आयशर ट्रकने मॅक्झिमो गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मॅक्झिमो गाडी उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूने जोरात आदळली. झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
आयशर ट्रक चालकाची चूक असल्याची प्राथमिक माहिती
नाशिक कडून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोसिमो गाडीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे आयशर ट्रक चालकाची चूक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिक्सीमो गाडीतील 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 7 प्रवासी जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान , अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे. मृतांची ओळख पटली आहे. जखमी लोकांवर मॅक्स केअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
अपघातात मृत्युमुखी झालेल्यांची नावे
1) देबुबाई दामू टाकळकर – वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2)विनोद केरूभाऊ रोकडे – 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
3) युवराज महादेव वाव्हळ – वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
4)चंद्रकांत कारभारी गुंजाळ – वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
5) गीता बाबुराव गवारे – वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
6) भाऊ रभाजी बडे – वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
7) नजमा अहमद हनीफ शेख – वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर
8) वशिफा वशिम इनामदार – वय 5 वर्ष
9) मनीषा नानासाहेब पाचरणे – वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे