Horoscope | आजचे भविष्य (बुधवार : 14 एप्रिल 2021)

Daily Horoscope | आजचे राशिभविष्य ।

मेष
सर्व महत्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात कार्यक्षमता वाढेल. कामाचा उरक दांडगा राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठाची मर्जी तुमचेवर राहील. जादा सुविधा व सवलती मिळतील. नोकरदार महिलांना सहकाऱ्यांची मदत कामात होईल. महिलांना गृहसौख्याचा अनुभव घेता येईल. वेळेचा सदुपयोग होईल. मुलांवरुन सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल.

वृषभ
मानसिक व शारिरीक आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्‍वासाने नव्या कामांना लागाल. व्यवसायात कल्पकता दाखवून कामे मार्गी लावाल. चांगल्या घटना मन प्रसन्न करतील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल. नोकरीत इतरांचे छान सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. बढती, पगारवाढीची शक्‍यत महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. प्रियजनांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तरुणांचे विवाह ठरतील.

मिथुन
“”मनी वसे ते स्वप्नी दिसे” हया म्हणीचे प्रत्यंतर सप्ताहात होईल. व्यवसायात स्वप्ने साकार होतील. नवीन पाऊल त्या दिशेने टाकाल. अधिक गुंतवणूक करणे भाग पडेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामे गती घेतील. नोकरीत तुमची व तुमच्या कामाची किंमत इतरांना कळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. कामानिमित्ताने प्रवास होईल. नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा हुरुप येईल. प्रकृतीमान चांगले राहील.

कर्क
“”रात्र थोडी सांगे फार” अशी स्थिती तुमची होईल. व्यवसायात नजरेच्या टप्प्यात कामे असतील ती वेळेत पूर्ण करणे हेच उदिद्‌ष्ट राहील. कर्तव्यपूर्तींकडे विशेष लक्ष दयाल. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत कर्तृत्व दाखवण्याची सुसंधी मिळेल. बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करा. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. महिलांनी कौटुंबिक प्रश्‍नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वादाचे प्रसंग आले तर तडजोडीचे धोरण ठेवावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.

सिंह
काही संस्मरणीय घटना या सप्ताहात घडतील. मानसन्मान, अनपेक्षित लाभाची शक्‍यता. व्यवसायात आत्मविश्‍वास वाढेल. महत्वाचे करारमदार होतील. मोठयांच्या सल्ल्याचा उपयोग कामात होईल. नोकरीत भेटीगाठीमुळे कामे होतील. मिळालेल्या संधीचा फायदा उठवाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरदार महिलांना कामाचे समाधान मिळेल. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. पैसे मनाप्रमाणे खर्च करता येईल.

कन्या
व्यवहारी धोरण ठेवून कामांना प्राधान्य दयाल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन उलाढाल वाढवाल. परिस्थितीवर मात करुन प्रश्‍न मार्गी लावाल. नोकरीत विरोधकांवर मात कराल. कामाचे व आर्थिक नियोजन अचूक होईल. महत्वाचे पत्रव्यवहार होतील. कामानिमित्ताने प्रवास होईल. महिलांना घरातील इतर व्यक्तिंच्या वागण्याचा विचित्र अनुभव येईल. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. प्रकृतीमान ठीक राहील. काळजी घ्या.

तूळ
मनःशांती टिकवणे हे तुमच्या हातात आहे तरी प्राणायाम व ध्यानधारण करुन शांत राहण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायात नवीन आव्हाने स्विकारावी लागतील. हातून चांगली कामे होतील. नोकरीत संयमाने वागून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. मते व विचार पटले नाहीत तरी शांत रहावे. पैशाच्या मोहमायी पाशापासून चार हात लांब राहणे उचित ठरेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. नवीन उद्योग लावून घ्यावा. सामूहिक कामात प्रतिष्ठा वाढेल.

वृश्‍चिक
माणसांची पारख या सप्ताहात तुम्हाला होईल. व्यवसायात विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कर्तव्यपूर्तीकडे विशेष लक्ष दयावे लागेल. पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत कामात वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल. ही अपेक्षा फोल ठरेल. अतिआत्मविश्‍वास टाळावा. पैशाचे व्यवहार करताना मैत्री व व्यवहार यांची गल्लत करु नये. महिलांनी झेपेल तेवढेच काम करावे. दगदग धावपळ कमी करावी.

धनू
ग्रहमानाची साथ मिळेल. व्यवसायात नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत वेळेचा सदुपयोग कराल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. जुनी येणी वसुल झाल्याने आर्थिक प्रश्‍न संपेल. बेकारांना नोकरीची संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन खरेदी, पाहुण्यांची सरबराई मुलांच्या मागण्य, हट्‌ट पुरवण्यात बरेच पैसे खर्च होतील. मानसिक समाधान मिळेल. महिलांचे आरोग्य उत्तम राहील. सुवार्ता कळेल.

मकर
व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळवून दाखवाल. तुमचा आत्मविश्‍वास, जिद्‌द वाखाणण्याजोगी असेल. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामे हाती घ्याल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. त्या निमित्ताने नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. घरात महिलांनी अनावश्‍यक खर्च टाळावेत. विनाकारण चिंता व काळजी करु नये. दिवस मित्रमैत्रीणी, नातेवाईक यांचेसमवेत आनंदात घालवावेत. प्रकृतीमान थोडे नाजूक राहील. काळजी घ्यावी.

कुंभ
अनपेक्षित फायदा देणाऱ्या घटना या सप्ताहात घडतील. व्यवसायात वसुलीचे प्रमाण वाढेल. पैशाची िंचंता मिटेल. मनातील सुप्त बेत साकार होतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय आता तुम्हाला मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना मनःस्वास्थ उत्तम राखता येईल. घरगुती प्रश्‍न मार्गी लागतील. सुवार्ता कळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. सामूहिक कामात मान मिळेल.

मीन
तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे अनेक तऱ्हेने लाभ होईल. व्यवसायात प्रगती चांगली राहील. नवीन कामे मिळतील. पत टिकून राहील. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत परदेशगमन व पत्रव्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. त्यामुळे वरिष्ठ अधिकार व सवलती देतील. त्याचा उपयोग महत्वाचे निर्णय घेताना होईल. महिलांना आनंदवार्ता समजतील. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना उत्तम ग्रहमान.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.