Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 8 एप्रिल 2021)

Daily Horoscope | आजचे राशिभविष्य ।

मेष
मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ मानून कामे कराल. यशाची कमान उंचावेल. नोकरीत ओळखीचा उपयोग होईल. अपेक्षित पत्रे हातील येतील. महिलांना चांगली बातमी कळेल. सणासुदीच्या निमित्ताने नवीन खरेदी कराल. कलाकार, खेळाडूंना मानमरातब, प्रसिद्धी मिळेल.

वृषभ
योग्य वेळी घेतलेले निर्णय व्यवसायात फायदा मिळवून देतील. नवीन कामे मिळतील. स्वतःची कुवत ओळखून पुढे जा. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा आला असेल तर छोटी सहल काढा. आवडत्या छंदात वेळ रमवाल. महिलांनी अनावश्‍यक खर्च करु नयेत. नव्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण घेऊ नये.

मिथुन
व्यवसायात नोकरीत प्रगती होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. अतिस्पष्टवक्तेपणामुळे त्रास होण्याची शक्‍यता. महत्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. परदेशगमनाचे योग येतील. महिलांना प्रियजन व आप्तेष्ट यांच्य सहवासाने आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. नवीन घराचे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.

कर्क
कामाची योग्य आखणी केल्याने यश संपादन कराल. अर्धवट राहिलेली कामे गती घेतील. व्यवसायात विस्ताराच्या कल्पना फलद्रुप होतील. नोकरीत वरिष्ठांना तुमचे व तुमच्या कामाचे महत्व कळून येईल. कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. अनपेक्षित लाभ होतील. घरकामात महिलांचा वेळ मजेत जाईल. नवीन खरेदी होईल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दिरंगाई करु नये.

सिंह
महत्वाचे ग्रह अनुकूल आहेत तेव्हा तुमचा उत्साह वाढता राहील. व्यवसायात बदल करुन फायदा मिळवून देणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी येतील. नोकरीत वरिष्ठ महत्वाची कामे तुमचेवर सोपवतील. त्यात यशश्री संपादन कराल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या दिमतीत जाईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मित्रांवर अवलंबून राहू नये.

कन्या
व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क रहावे लागेल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे हाताळा. कामात गरजेप्रमाणे लवचिक धोरण ठेवा. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करा. मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करुन घ्या. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिला गृहसजावटीसाठी पैसे खर्च करतील. मनाप्रमाणे कामे झाल्याने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.

तूळ
व्यवसायात अनपेक्षित चांगले बदल होतील. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. तुमचे घेतलेले निर्णय अचूक ठरतील. आर्थिक प्रगती होईल. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. महिलांचा वेळ नको त्या कामात जाईल. पेल्यातील वादळे निर्माण होण्याची शक्‍यता. मुलांकडून अभ्यासाबाबत काळजी राहील. लक्ष दया. तरुणांनी अतिसाहस टाळावे.

वृश्‍चिक
व्यवसाय वृद्धिंगत होण्यास अनुकूल काळ आहे. कामात बदल करुन फायदा मिळवण्याकडे कल राहील. नवीन घडामोडी व नवीन विचार फायदेशीर ठरतील. नोकरीत मनातील सुप्त इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सहकारी कामात मदत करतील. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. जादा कामातून पैसे मिळतील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. अलिप्त धोरण ठेवून कामे उरकावीत. विद्यार्थ्यांनी नाचरेपणा करु नये.

धनू
“”प्रयत्नांती परमेश्‍वर” हा बाणा तुमचा असेल. व्यवसायात नवीन उत्पन्नाचे साधन मिळाल्याने आनंद वाटेल. पूर्वी केलेल्या कामातून आता फायदा मिळेल. कामात कार्यतत्पर राहिल्यास फायदा होईल. नोकरीत तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांना दाखवण्याची संधी मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. उच्च शिक्षणासाठी परदेशगमनास चांगला काळ. महिलांनी हट्‌टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे. राग आवरावा. घरात नवीन खरेदी होईल. प्रकृतीमान नाजूक राहील.

मकर
मनाची झालेली द्विधा मनःस्थिती बरीचशी कमी होईल. व्यवसायात शेअर्समधून फायदा होईल. नवीन कामे मिळतील. नवीन आशावाद जागृत होईल. चांगली बातमी कळेल. नोकरीत महत्वाची कामे हातावेगळी करा. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. नवीन महत्वाची जबाबदारी स्विकारावी लागेल. जोडधंद्यातून फायदा होईल. महिलांनी अतिहव्यासापोटी जादाची कामे स्विकारु नयेत. दगदग धापवळ कमी करावी. आवडत्या छंदात वेळ घालवाल. तरुणांना नवीन व्यक्तींबाबत आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा.

कुंभ
ग्रहमान हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे कामाचा उत्साह दिवसेंदिवस वाढेल. व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील. अनपेक्षित कामे होतील. कामात विस्तार करण्याचे बेत सफल होतील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश संपादन करु शकाल. बेकारांना नवीन नोकरीची संधी कलाकार खेळाडूंना मानमरातब मिळेल. महिलांची अध्यात्मात प्रगती होईल. प्रियजनांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. नवीन जागा, वास्तू खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.

मीन
तुमच्या रसिक व कल्पक स्वभावाला पूरक ग्रहमान लाभल्याने जीवनाचा आनंद पुरेपूर लुटाल. व्यवसायात कामातील अडथळे दूर झाल्याने कामांना गती येईल. खेळत्या भांडवलाची गरज हितचिंतकाच्या मदतीने भागेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात असतील. नोकरदार व्यक्तिंना मनाप्रमाणे कामे केल्याने आनंद मिळेल. कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम मिळेल. एखादी सवलतही वरिष्ठ देतील. घरात कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कुटुंबासमवेत सहजीवनाचा आनंद घ्याल. प्रकृतीमान सुधारेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.