Horoscope | आजचे भविष्य (रविवार : 11 एप्रिल 2021)

Daily Horoscope | आजचे राशिभविष्य ।

मेष
तुमचे मनोधैर्य चांगले असल्याने अडथळयांवर मात कराल. व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी काही ठोस पावले उचलाल. त्याचा फायदा तुम्हाला होईल. नोकरीत कामे स्विकारताना स्वतःची पात्रता ओळखून पुढे जा. नोकरदारांना कामानिमित्ताने प्रवास संभवतो. कलावंतांना प्रसिद्धीचे योग येतील. कवी साहित्यिकांच्या हातून उत्तम लेखन होईल. महिलांनी सभोवतालच्या व्यक्तिंशी होणारे वादविवादाचे प्रसंग टाळावेत. विद्यार्थ्यांपुढे भविष्याबाबत कोडे निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

वृषभ
कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम असे धोरण असेल. आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यवसायात उधारी वसुलीकडे लक्ष केंद्रित करा. पैसा चांगला मिळेल. परंतू खर्चही तसाच असेल. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्‍वासने ते पाळतील. महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना कौटुंबिक सौख्य उत्तम मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग.

मिथुन
कर्तव्याला प्राधान्य देऊन अवघड कामे मार्गी लावाल. व्यवसायात स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. आर्थिक उन्नती झाल्याने कार्यक्षमता वाढेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत “”ऐकावे जनाचे करावे मनाचे” हे धोरण ठेवा. बेकारांना कामाची सुसंधी मिळेल. शेअर्सच्या व्यवहारात फायदा संभवतो. महिलांना कौटुंबिक जीवनात सहजीवनाचा आनंद मिळेल. नवीन जागा, वास्तू, वाहन खरेदीचे योग.

कर्क
ग्रहमान अनुकूल असल्याने आर्थिकदृष्टया विशेष लाभ होईल. व्यवसायात विस्ताराचे बेत साकार होतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. सुखसुविधा मिळतील. परेदशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. महिलांचा दिनक्रम धावपळ दगदगीचा राहील. छंदात वेळ मजेत घालवतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. घरगुती कार्यक्रम होतील.

सिंह
व्यवसाय उदयोगात खेळत्या भांडवलांची सोय होईल. मनातील सुप्त इच्छा आकांक्षा सफल होतील. कामात उलाढाल वाढेल व फायदयाचे प्रमाणही वाढेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत तुमच्या कौशल्याला पूरेपूर वाव मिळेल. सहकारी व वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. बेरोजगारांना काम मिळेल. महिलांचा वेळ घरसजावटीमध्ये जाईल. भावंडांचे सुख उत्तम मिळेल. विद्यार्थ्यांनी मनोनिग्रह करावा.

कन्या
आशा व निराशा या दोन्हींचा अनुभव येईल. आनंदाची बातमी नवीन आशा पल्लवित करेल. तर एखादी घटना मन साशंक बनवेल. व्यवसायात कामाची योग्य आखणी करुन कामे वेळेत संपवा. उधार उसनवार टाळा. व्यवहार चातुर्यामुळे काही क्षेत्रात उत्तम यश मिळेल. नोकरदार व्यक्तिंनी तापट स्वभावावर आळा घालावा. नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. महिलांनी कामाचा बाऊ न करता कामे उरकावीत व जमल्यास छोटासा फेरफटका मारुन पुन्हा ताजेतवाने व्हावे.

तूळ
व्यवसायात प्रगतीचा वेग उत्तम राहील. त्यामुळे नवीन गुंतवणूक करणे गरजेचे होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. महत्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. नोकरीत मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल. परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांनी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नयेत. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थी चिकाटीने ज्ञानार्जन करील व यशही संपादन करतील. नवविवाहितांना अपत्यसुखाची चाहूल लागेल.

वृश्‍चिक
आत्मविश्‍वासाने नवीन कामे हाती घ्याल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करुन फायदयाचे प्रमाण वाढवाल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. बढती मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. बेकारांना कामधंदा मिळेल. महिलांचा वेळ छंदात मजेत जाईल. जिवाभावाची माणसे भेटल्याने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.

धनू
व्यवसायात व नोकरीत लवचिक धोरण ठेवाल. जशी कामाची गरज असेल तसे कामाचे नियोजन कराल. व्यवसायातील तांत्रिक अडथळे दूर करुन कामे वेळेत बिनचूक पूर्ण कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. कामानिमित्ताने सवलती मिळतील त्याचा गैरफायदा घेऊ नका. छोटा प्रवास घडेल. महिलांना तब्येतीची काळजी घ्यावी. दगदग धावपळ करु नये. अतिस्पष्टवक्तेपणा टाळावा.

मकर
व्यवहारी धोरणाचा अवलंब करुन व्यवसायात फायदा मिळवाल. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे हाती घ्याल व तडीस न्याल. जुनी-येणी वसुल होतील. व्यापारांना यशाचा काळ. खर्चावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत महत्वाची कामे वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. अशक्‍य वाटणाऱ्या कामात यशश्री संपादन कराल. दगदग, धावपळ वाढेल. महिलांना मुलांच्या प्रगतीविषयी चांगली बातमी कळेल. घरात शुभकार्ये ठरतील. तरुणांना नवीन व्यक्तिंचे आकर्षण वाटेल.

कुंभ
“”प्रयत्न वाळूचे ……..” ही म्हण सार्थ ठरेल. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करुन उलाढाल वाढवाल. जादा कामातून उत्पन्न मिळेल. हितचिंतकाची मदत होऊन कामे मिळतील. नोकरदार व्यक्तिंना सहकारी व वरिष्ठांशी जमवून घ्यावे लागेल. कामानिमित्ताने दूरचे प्रवास व परदेशवारीही होईल. महिलांचा वेळ पाहुण्यांच्या तैनातीत जाईल. घरात नातेवाईक, प्रियजन आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

मीन
नशीब व प्रयत्न यांची सांगड घालून कामातील प्रगतीचा वेग वाढवाल. कामातील अडथळयांवर आत्मविश्‍वासाने मात कराल. व्यवसायात तुमच्या हौशी स्वभावाचा फायदा होईल. खरेदी वाढेल. जितके काम जास्त तितकी कमाई जास्त कराल. आर्थिकमान उंचावेल. नोकरीत विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संपर्क होईल व त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल. महिलांचा कामाचा झपाटा वाखणण्याजोगा असेल. काम करण्यात मजा वाटेल. प्रकृतीमान उत्तम राहील. सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी कळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.