Horoscope | आजचे भविष्य (शनिवार : 3 एप्रिल 2021)

Daily Horoscope | आजचे राशिभविष्य ।

मेष
व्यवसायात प्रगतीसाठी काही ठोस पावले उचलाल. कामात कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. मनाप्रमाणे कामे होतील. कामात प्रसंगावधान दाखवाल. बेकारांना नवीन संधी चालून येईल. महिलांना मनःस्वास्थ्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरूणांचे विवाह होतील. विद्‌यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.

वृषभ
व्यवसायात व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य दयाल. जुनी-येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित कराल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरीत महत्वाचे पत्रव्यवहार होतील. कामात कल्पकता दाखवाल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा फायदा निर्णय घेताना होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. शुभकार्यात वेळ चांगला जाईल. विद्‌यार्थ्यांना प्रगतीकारक.

मिथुन
मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग कराल. ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. अनपेक्षित लाभ होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमच्या कामामुळे तुमची पत व प्रतिष्ठा वाढेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. नवीन कामाची संधी मिळेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. मानसिक आरोग्य उत्तम राहील.

कर्क
व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित अचूक आखलेत तरच फायदा होईल. कामात सातत्य टिकवावे लागेल. परिस्थितीशी जमवून घेतलेत तर वेळ व शक्ती खर्च होणार नाही. नोकरीत मनाविरूद्ध काम करावे लागले तरी मनावर संयम ठेवून वागावे लागेल. खर्च खुप होईल. त्यामुळे अनावश्‍यक खर्च करू नका. महिलांनी वादाच्या मुद्‌द्‌यांपासून चार हात लांब रहाणे चांगले. प्रकृतीची काळजी घ्यावी. बोलताना सावधगिरीने बोलावे. विद्‌यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे.

सिंह
व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. योग्य वेळी महत्वाचे निर्णय घेऊन प्रगती कराल. तुमचे अंदाज खरे ठरतील. आर्थिकमान सुधारेल. नोकरीत शुभ घटना घडतील. रेंगाळलेले प्रश्‍न व कामे मार्गी लागतील. मनाची उमेद व उत्साह वाढेल. विशेष लाभ होतील. महिलांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना चांगली बातमी कळेल. स्वास्थ्य उत्तम राहील. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

कन्या
महत्वाच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभल्याने प्रत्येक बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे फळ आता मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्विकाराल. प्रवास घडेल. हितचिंतकांची मदत होईल. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांनी कामात कल्पकता दाखवावी. वरिष्ठांकडून कौतुक होईल. विद्‌यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा. यश मिळेल.

तूळ
व्यवसाय नोकरीत सकारात्मक दृष्टीकोन फार उपयोगी पडेल. इतरांना न जमणारी कामे हाती घेऊन यश मिळवाल. रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लावाल. आर्थिक देणी देता येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कौतुकास पात्र अशी कामगिरी हातून घडेल. वरिष्ठांची मर्जी तुमचेवर राहील. कौटुंबिक स्वास्थ्य महिलांना उत्तम लाभेल. नोकरी करणाऱ्या महिलांना सुसंगती लाभेल. आरोग्य ठीक राहील. सामाजिक कार्य कराल. तरूणांचे विवाह जमतील.

वृश्‍चिक
तुमची जिद्‌द व आत्मविश्‍वास हा वाखाणण्याजोगा असेल. व्यवसायात भाग्यवर्धक घटना घडतील. नवीन कार्यक्षेत्र निवडून मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्याल. नोकरीत कामाचा उरक पाडाल. नावलौकिक मिळवाल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन मित्र जोडले जातील. महिलांना कामाचा हुरूप येईल. स्वास्थ्य लाभेल. नवीन खरेदीचे मनसुबे साकार होतील. तरूणांना नवीन व्यक्तिंचे आकर्षण वाटेल. विद्‌यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान.

धनू
व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. अर्थप्राप्ती चांगली झाली तरी पैशाची आवक जावक सारखी राहील. नवीन कामे मिळवताना दगदग धावपळ करावी लागेल. कामात बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत “”शब्द हे शस्त्र आहे” हे लक्षात ठेवून बोलावे. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. नोकरदार महिलांनी मनाची एकाग्रता साधून कामे करावीत. महिलांनी ताण न पाडता घरातील कामे करावीत.

मकर
व्यवसायात महत्वाची कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण दूर होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. प्रगतीचा आलेख चढता राहील. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन प्रशिक्षणसाठी संधी देतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. महिलांना मुलांकडून प्रगतीच्या बातम्या समजतील. गृहसजावटीत वेळ मजेत जाईल. नोकरदार महिलांना कामात छान यश मिळेल. खेळाडू, कलाकरांना प्रसिद्धी मिळेल.

कुंभ
धैर्य व चिकाटीने व्यवसायात यश संपादन करू शकाल. ग्रहमानाची साथ उत्तम मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशाची स्थिती चांगली राहील. नोकरीत स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. कामात गुप्तता राखाल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगतीपथावर राहता येईल. आरोग्य चांगले राहील. विद्‌यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. तरूणांनी अतिसाहस करू नये.

मीन
“”शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ” या म्हणीचा उपयोग व्यवसायात होईल. ग्रहमानाची फारशी साथ नसली तरी कामात यश मिळवाल. हितचिंतकांची मदत घेऊन कामे हातावेगळी कराल. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करून कामे उरकाल. पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत. याकडे विशेष लक्ष दयाल. महिलांनी वादविवाद टाळावेत. सहनशीलता बाळगून संघर्ष टाळावा. प्रकृतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष दयावे. विद्‌यार्थ्यांनी व तरूणांनी नाचरेपणा करू नये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.