मेष
ग्रहांची साथ मिळेल. आर्थिक सुधारणा होईल. व्यवसायात तुम्ही तुमच्या निर्णयाशी ठाम रहाल. इतरांना तुमची एखादी कल्पना परवडली/ पटली नाही तरीही त्याच कल्पनेचा तुम्ही पाठपुरावा कराल. नोकरीत प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुमचे प्रयत्न राहतील. कामात शॉर्टकट घेऊन काम संपवाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास होईल. घरात इतरांशी मिळतेजुळते घ्या नाहीतर खटके उडतील. कलावंत, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात नवीन काहीतरी करावेसे वाटेल. महिलांना पदार्थांचे नवनवीन प्रयोग करावेसे वाटतील. तरुणांना-साहस, धाडस करावसे वाटेल. पैशाची चिंता मिटेल.
वृषभ
योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. व्यवसायात प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळया मार्गाचा अवलंब कराल. कामामुळे सभोवतालचे वर्तुळही बदलेल. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती आल्याने पैशाची नड भागेल. खेळत्या भांडवलाची सोयही होईल. नोकरीत महत्वाची जबाबदारी तुमच्यावर असेल. त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. अधिकारही प्राप्त होईल. घरात अत्यावश्यक खरेदी होईल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. महिलांचा वेळ मजेत जाईल. मानसिक समाधान मिळेल. तरुणांनी मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. उत्साही रहाल.
मिथुन
परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या ध्येय धोरणात बदल केलात तर त्याचा लाभ होईल. व्यवसायात पैशाची चणचण जाणवली तरी तात्पुरती पैशाची सोय होईल. वायफळ खर्चावर बंधन ठेवा. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत नवीन करार होतील. काही ठोस निर्णय घेता येतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश येईल. कामाचा ताण कमी होईल. घरात वातावरण आनंदी राहील. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. मनोबल उंचावेल. प्रकृतीची साथ मिळेल. कलावंत खेळाडूंना क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. महिलांनी अतिदगदग करु नये. तरुणांनी वरिष्ठांच्या मर्जीत रहावे.
कर्क
पैशाची आवक जावक समसमान राहील. व्यवसायात जी कामे हाती घेतली होती त्यांना वेग येईल. आर्थिक स्थिती बरी राहील. विशिष्ठ कामासाठी जोडलेले संबंध संपुष्टात येतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. परंतू न रागवता काम करीत रहा. घरात तरुणांना विवाहासंबंधीचे निर्णय घेणे कठीण होईल. थोडी सबुरी ठेवा. भावनिक चढउतार / वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. महिलांनी आपले छंद जोपासून मन गुंतवावे. तरुणांनी “”अति तेथे माती” ही म्हण लक्षात ठेवून सर्वांशी वागावे. मित्रसंगतीमुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
सिंह
आशावादी दृष्टीकोन ठेवून प्रत्येक कामं हाती घ्याल. व्यवसायात कंटाळवाणे काम संपल्याने हायसे वाटेल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरीत गरजेनुसार वेगळे कांम हाताळण्याची संधी मिळेल. जोडधंदा असणाऱ्यांना अचानक धनालाभाची शक्यता आहे. प्रतिष्ठा मिळेल. घरात तरुणांना नवीन मित्रमंडळींचे आकर्षण वाटेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना अंगी असलेले गुण दाखवण्याची संधी मिळेल. कामाचे कौतुक होईल. तरुणांना अपेक्षित जोडीदार भेटेल. नवीन नोकरीची संधी चालून येईल.
कन्या
“”अंथरुण पाहून पाय पसरा.” व्यवसायात नवीन योजनांना मूर्त स्वरुप देता येईल. नवीन कामे मिळतील. त्यामुळे जादा भांडवलाची उभारणी करावी लागेल. पैशाची सोय होईल. नोकरीत बदल करु इच्छिणाऱ्यांनी त्यादृष्टीने वाटचाल करावी. बोलण्याने जवळची माणसे दुरावण्याची शक्यता आहे. घरात लांबलेले कार्य ठरेल. तरुणांनी मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवावा. महिलांनी मानापमान दूर ठेवून इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे. तरुणांनी स्वतःची ध्येय व उद्दीष्टे ठरवून त्याप्रमाणे प्रगती करावी.
तूळ
आर्थिक स्थैर्य व दिलासा देणारे ग्रहमान लाभेल. व्यवसायात कामे नियंत्रणात ठेवण्यात यश येईल. सरकारी कामात सुधारणा होईल. नवीन व्यक्तिंशी हितसंबंध जोडले जातील. नोकरीत कंटाळवाणे काम संपेल. कामानिमित्ताने परदेशगमनाचा मानस राहील. मनाजोगता खर्च करता येईल. घरात नवीन जागा खरेदीसंबंधीचा निर्णय होईल. घरगुती कामे पुन्हा डोके वर काढतील त्यामुळ थोडा वेळ दयावा लागेल. आप्तेष्टांच्या सहवासाने आनंद वाटेल. महिलांना अनपेक्षित अडीअडचणींना सामोरे जावे लागेल. तरी मनाची तयारी करावी. तरुणांनी सावधगिरी ठेवून कृती करावी. खोटया आश्वासनांना भुलू नये.
वृश्चिक
कामांवर लक्ष केंद्रित करुन जास्तीत जास्त फायदा मिळवण्यावर तुमचा भर राहील. व्यवसायात योग्य व्यक्तिंशी संपर्क साधून कामे मार्गी लावाल. सण व उत्सवनिमित्ताने नवीन योजना आखून विक्री व उलाढाल वाढवाल. नोकरीत नवीन कामाची सुरुवात होईल कमी श्रमात जास्त यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. अपेक्षित पैसे मिळतील. घरात नवीन जागा, वास्तू खरेदीच विचार विनिमय होईल. तरुणांना मनपसंत व्यक्तिची जोडीदार म्हणून निवड करता येईल. तुमची बाजारातील पत वाढेल. महिलांना मानाचे पद मिळेल. जिभेवर साखर पेरुन इतरांशी बोलावे.
धनू
वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करुन प्रगती करण्याचा मानस असेल. त्यात यश मिळेल. नवीन कामे ओळखीतून मिळतील. बॅंक व वित्तीय संस्था इ. ची मदत खेळते भांडवल उभारणीसाठी होईल. नोकरीत महत्वाच्या कामांना प्राधान्य दयाल. स्वतः लक्ष घालून कामे पूर्ण कराल. सहकारी कामात मदत करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. धार्मिक कार्ये ठरतील व त्यात पुढाकार राहील. महिलांना मनशांती लाभेल. तरुणांना प्रगतीच्या दिशा खुल्या होतील. त्यामुळे घोडदौड चांगली राहील.
मकर
विश्वासार्हता पडताळून इतरांवर कामे सोपवलीत तर बरीच कामे मार्गी लागतील. व्यवसायात संमिश्र ग्रहमान राहील. जुने काम संपून नवीन काम हाती घ्याल. बाजारातील चढउतारांकडे लक्ष देणे गरजेचे होईल. नोकरीत आपल्या मर्यादा ओळखून काम करा. कोणत्याही गोष्टीची मागणी करताना वरिष्ठांचा मुड बघून करा. अट्टाहास ठेवू नका. घरात सहजीवनाचा आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांचा आत्मविश्वास वाढेल. कृतीवर भर दिल्याने कामे गती घेतील. तरुणांचा आनंद द्विगुणीत करणारी घटना घडेल. पैशाची चिंता मिटेल.
कुंभ
साशंकता न ठेवता कामे करीत रहा. कामाचा वेग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहाल. व्यवसायात निष्णात व्यक्तिंचा सल्ल आवश्यक तेव्हा घ्या. पैशाचा मोह टाळा. कुसंगत धरु नका. नोकरीत कामात फेरबदल होतील. आडमुठे धोरण बाजूला ठेवून सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागावे लागेल. घरात तुम्ही तुमचे कौशल्य दाखवा. मोठया खर्चाचा बोजा तुमचेवर येईल. मात्र केलेल्या कामाचे समाधान मिळेल. महिलांनी वैचारिक देवाणघेवाण केली तर बरेच प्रश्न सुकर होतील. तरुणांनी दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करावा. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल.
मीन
ग्रहमानाची साथ राहील. अनपेक्षित काही कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन हितसंबंध जोडले जातील. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यश येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. त्यामुळे जादा सुखसुविधा मिळतील. जुन्या हितसंबंधांना उजाळा मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. घरात छोटा समारंभ ठरेल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. महिलांना गृहसौख्य मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. तरुणांनी अतिविश्वास / अंधविश्वास ठेवू नये. अतिधाडस सुद्धा करु नये.