Horoscope | आजचे भविष्य (सोमवार : 3 मे 2021)

Daily Horoscope | आजचे राशिभविष्य ।

मेष
घेतलेले निर्णय अचूक व फायदा मिळवून देतील. व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी विशेष जागरुक रहाल. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला घ्याल. खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घरात सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होईल. नवीन नोकरी मिळेल. विद्यार्थ्यांनी मात्र कंबर कसून अभ्यासाला लागावे.

वृषभ
व्यवसायात महत्वाच्या कामांना प्राधान्य दयाल. बदल करण्याचे बेत मनात घोळतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. मात्र हे करताना स्वतःची कुवत ओळखा. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करुन घ्या. पुढे पुढे करुन नवीन जबाबदारी ओढवून घेऊ नका. महिलांनी दगदग धावपळ कमी करावी. नको त्या कामात वेळ बराच जाईल. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.

मिथुन
धंदा व्यवसायात पूर्वी केलेल्या कामातून बराच फायदा होईल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नवीन कामे ओळखीचा उपयोग होऊन मिळतील. नोकरीत कामाचा मनस्वी कंटाळा येईल तरीही महत्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यांकडून करवून घ्याल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. बेकारांना मात्र नवीन नोकरीची सुसंधी चालून येईल. महिलांचा आवडत्या छंदात वेळ मजेत जाईल. सुवार्ता कळेल. तरुणांचे विवाह जमतील. खेळाडूंना खेळात नैपुण्य मिळेल.

कर्क
धाडसी पावले उचलाल. व्यवसायात आलेल्या अडचणींवर मात करुन यश संपादन कराल. कामाचा व्याप वाढेल. त्यामुळे दगदगही होईल. प्रगतीचा आलेख मात्र उंचावत जाईल. त्यामुळे समाधान मिळेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. मानमरातब व प्रसिद्धीचे योग येतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांचा वेळ गृहसजावट व नवीन खरेदीत जाईल. पैशाची चिंता मिटेल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला उत्तम ग्रहमान.

सिंह
मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील. कामात उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहाल. नोकरीत अपेक्षित पत्रव्यवहार होतील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्व इतरांना कळून येईल. महिलांना वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. छोटीशी सहल काढाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

कन्या
तुमचा आनंद व उत्साह द्विगुणीत करणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात नवीन कामाची संधी मिळेल. पैशाची चिंता मिटेल. केलेल्या कामाचे फळ ताबडतोब मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमचेवर राहील. जादा सवलती व अधिकार ते देतील. मात्र त्याचा गैरवापर करु नये. प्रकृतीमान सुधारेल. नोकरदार महिलांना कौतुकाची थाप मिळेल. महिलांना नवीन खरेदीचा आनंद लुटता येईल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

तूळ
कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम कराल. व्यवसायात फायदा मिळवून देणाऱ्या कामांन प्राधान्य दयाल. नवीन काहीतरी करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. नोकरीत तुमच्या हट्‌टी व हेकेखोर स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच खर्चावरही नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध काम करावे लागेल तरी रागावू नका. महिलांचा घरात नको त्या कामात बराच वेळ जाईल. संततीबाबत थोडी विवंचना राहील. तरुणांना नवीन साहस धाडस करावेसे वाटेल. खेळाडूंना कलाकारांना नेत्रदिपक यश मिळावे.

वृश्‍चिक
व्यवसायात नवीन धोरणांचा व कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा मानस असेल. कामाच्या स्वरुपात बदल व नवीन दुसरा एखादा व्यवसाय करावयास तूर्तास धीर धरा. खेळत्या भांडवलाची सोय करा. नोकरीत वरिष्ठांचा मूड सांभाळणे आवश्‍यक राहील. कामानिमित्ताने दूरच्या प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांच्या मनातील इच्छा व आकांक्षा सफल होतील. चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.

धनू
नवीन आशेचा किरण तुम्हाला प्रोत्साहन देईल. कामाचा हुरुप वाढेल. व्यवसायात कामांना गती येईल. अर्धवट कामे मार्गी लागतील. पैशाची चिंता मिटेल. जुनी येणी वसुल होतील. नोकरदार व्यक्तिंना मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल. परदेशगमन व परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांचा स्वभाव थोडा लहरी राहील. तोंडात साखर ठेवून इतरांशी बोलावे तरुणांचे विवाह जमतील.

मकर
व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर विशेष लाभ होईल. कामाची नवीन संधी मिळेल. कामातील बेत गुप्त ठेवा. हितशत्रूंच्या कारवायांवर बारीक नजर ठेवा. अनावश्‍यक खर्च टाळा. नोकरीत कामाचा ताण वाढला तरी सहकारी कामात मदत करतील. नवीन जबाबदाऱ्या पूर्ण विचाराअंती स्विकारा. घरात महिलांनी हट्‌टी स्वभावाला मूरड घालावी. कुठलीही आश्‍वासने देऊ नका. पैशाचे बाबतीत फसवणूकीचा योग. प्रकृतीमान सुधारेल.

कुंभ
व्यवसायात तुमच्या लवचिक धोरणाचा विशेष लाभ होईल. स्वप्ने साकार होतील. ग्रहांची साथ लाभल्याने कमी श्रमात जास्त यश मिळेल. आर्थिक भरभराट उत्तम राहील. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवता येतील. महिलांनी विनाकारण होणारी दगदग धावपळ कमी करावी. मनावर बंधन ठेवावे. नव्या घराचे स्वप्न साकार होईल. खेळाडूंना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.

मीन
नशिबावी साथ मिळेल. रसिकता व कल्पकतेचा विकास होईल. हातातील कामे वेळेत पूर्ण कराल. प्रगतीचा आलेख चढता राहील. मानसिक आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्ये हातून घडतील. नोकरीत तुमचे महत्व इतरांना कळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. बोलण्यातू विशेष लाभ होईल. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. वादाचे प्रसंग आले तरी चिडू नका. विद्यार्थ्यांना उत्तम एकाग्रता मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.