Horoscope | आजचे भविष्य (शुक्रवार : 16 एप्रिल 2021)

Daily Horoscope | आजचे राशिभविष्य ।

मेष
अडीअडचणी अडथळे यांवर मात करून प्रगती साधाल जिद्‌द व आत्मविश्‍वास यांचे जोरावर यश मिळवाल. व्यवसायात कामांना गती दयाल. रेंगाळलेली कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याचा चंग बांधाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची साथ मिळेल. जादा कामाची तयारी असेल तर अर्थप्राप्ती चांगली होईल. घरात महिलांना त्यांचे क्षेत्रात प्रावीण्य दाखविता येईल. नवीन खरेदीचे बेत पार पडतील. कलाकार, खेळाडूंना यशप्राप्ती होईल. विद्‌यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढेल.

वृषभ
कर्तुत्वाला यशाची झालर मिळेल, त्यामुळे आनंद व्दिगुणीत होईल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दगदग, धावपळ वाढेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत महिलांना त्यांचे कार्यक्षेत्र व घर या दोन्हीकडे लक्ष देणे जड जाईल. पण वेळेचे व कामाचे योग्य नियोजन करून त्या यशस्वी होतील. पैशाचा उपयोग योग्य कारणासाठीच व्हावा हा अट्‌टहास असेल. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. मुलांकडून चांगली बातमी कळेल. महिलांना केलेल्या कष्टाचे सार्थक झाले याचे समाधान मिळेल.

मिथुन
नशीब व प्रयत्न यांची सांगड योग्य प्रकारे घालून यश संपादन कराल त्याला पूरक वातावरणाचीही साथं मिळेल. व्यवसायात अशक्‍यप्राय कामात यश मिळेल. तुमची कामाची उमेद दांडगी राहील. नवीन कामे सर्तक ठेवतील. नोकरीत आवश्‍यक असलेल्या गुणांची कदर वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून होईल त्यामुळे मुठभर मांस चढेल. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. घरात गृहकृत्यदक्ष रहाल. अनुकूल वातावरणाचा योग्य उपयोग करावा. विद्‌यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करू नये.

कर्क
कामात चोखंदळ राहून कामे योग्य पद्धतीने हातावेगळी करा. व्यवसायात मनोधैर्य उत्तम राखलेत तर बाजी माराल. सकारात्मक दृष्टीकोन उपयोगी पडेल. भरपूर काम करूनही म्हणावे तसे पैसे हाती न मिळाल्याने निराश व्हाल. पैशाची चणचण मिळालेल्या संधीचे सोने करा. आवश्‍यक तेथे वरिष्ठांचा सल्ला घ्या. घरात गैरसमजूतीने होणारे वाद टाळा. विश्रांती घेऊन कामे करा. महिलांनी उगीचच पराचा कावळा करून वागू नये. खेळाडू, कलावंतानी अतिसाहस टाळावे.

सिंह
तुमच्या मनाला पटेल रूजेल त्याप्रमाणेच वागा. केलेल्या कृतीचे समर्थन करा. व्यवसायात पैशासाठी कोणतेही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. मात्र कुसंगत टाळा. सद्‌सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. कार्यतत्पर राहून कामे करा. घरात पेल्यातील वादळे उठतील व पेल्यातच शमतील. दुर्लक्ष करा. तब्येत सांभाळा. तरूणांना मनपसंत जीवनसाथी मिळेल. विद्‌यार्थ्यांना अभ्यासाचा मूड लागेल.

कन्या
कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना घाई करू नये. व्यवसायात आवक जावक समसमान राहील. खर्चाचे गणित कोलमडेल तरी महत्वाच्या खर्चांना प्राधान्य दया. तात्पुरती पैशाची सोय होईल. नोकरीत हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. अतिविश्‍वास टाळा. कामातील बेत गुप्त ठेवा. घरात इतर व्यक्तिंच्या गरजा भागवूनही त्यांचे समाधान होईलच नाही. जुने आजार डोके वर काढण्याची शक्‍यता. मनन चिंतन करावे. सामूहिक क्षेत्रात झेपेल तेवढेच काम करावे.

तूळ
“”अंथरूण पाहून पाय पसरा” व्यवसायात यश मिळालेच पाहिजे हा अट्‌टहास धरू नका. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कृती करा. कोणतेही महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीत स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. पैशाचा अपव्यय टाळावा. घरात स्वतःचा हट्‌टी स्वभाव नडेल. इतरांचे विचारही ऐकून घ्या. व मगच तुमचे मत मांडा. वैचारिक मतभेद मन कलुषित करेल. सारासार विचारानेच कृती करा. महिलांनी तडजोडीचे धोरण स्विकारावे.

वृश्‍चिक
“”रात्र थोडी सोंगे फार” अशी स्थिती तुमची असेल. घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष दयावे लागेल. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन ध्येयधोरणे स्विकाराल. कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कृती कराल. नोकरीत वरिष्ठांच्या सल्लयानुसार काम करा. कोणतीही गोष्ट करताना गोंधळून न जाता शांतचित्ताने पुन्हा डोके वर काढतील. त्यातील मतितार्थ समजून घेऊन निर्णय घ्या. डोक्‍यावर बर्फ ठेवा. तरूणांनी अयोग्य संगत धरू नये.

धनू
दिलेला शब्द पाळा व कृती आणि विचार यांच्यात एकवाक्‍यता ठेवा. व्यवसायात सभोवतालच्या परिस्थितीशी मिळते जुळते घ्यावे लागेल कामात लवचिकता आणून त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील. अतिविश्‍वास टाळा. पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेऊ नका. नुकसान तुमचेच होईल. नोकरीत मनाप्रमाणे कामे होतील. “”आपले काम बरे की आपण बरे” हे धोरण उपयोगी पडेल. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग. चार पैसे जास्तच खर्च होतील. विद्‌यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करू नये.

मकर
योग्य वेळी योग्य व्यक्तिंचा उपयोग करून घेऊन कामे मार्गी लावण्यात तुमचा हातखंड असतो. परंतू या सप्ताहात माणसांची पारख करण्यात तुमची चूक होण्याची शक्‍यता. व्यवसायात जादा आत्मविश्‍वास ठेवू नये. पैशाच्या मोहमायी पाशापासून दूरच रहावे. जुनी येणी वसुलीकडे लक्ष दयावे. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करा. वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मांडा. मनातील बेत प्रत्यक्षात करण्याची तयारी असेल. घरात दगदग धावपळ करू नका. जिभेवर साखर ठेवून इतरांकडून खुबीने कामे करून घ्या. इतरांच्या कामाचे कौतुक करा.

कुंभ
जीवनपद्धती आहे अशीच टिकवण्यासाठी थोडी जास्त धावपळ दगदग करावी लागेल. पैसे मिळवण्यासाठी दुप्पट काम करणे गरजेचे होईल. व्यवसायात नवीन योजना उपक्रम हाती घेऊन ज्याप्रमाणे कृती करावी. मात्र त्यातील अटी नियमांचा आधीच विचार करून ठेवा. नोकरीत सहज वाटणाऱ्या कामात विलंब होण्याची शक्‍यता. कामानिमित्ताने लांब प्रवासाचे योग. नवीन ओळखी होतील. घरात मोठयांचे मार्गदर्शन महत्वाचे निर्णय घेताना उपयोगी पडेल.

मीन
“”अति सर्व वर्ज्य” असा अनुभव येईल. व्यवसायात हातातील कामे आधी संपवा मगच नवीन कामांकडे वळा. अडथळयांची शर्यत पार करून यश मिळेल. पैशाची स्थिती चांगली राहील. नोकरीत मौनव्रत बाळगा. हितशत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवा. जोडधंदयातून विशेष लाभ व्हावा. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे उरका. घरात अनावश्‍यक खर्च होतील. इतर व्यक्तिंच्या विचित्र वागण्याचा मनःस्ताप होईल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष दयावे. धीराने वागून कृती करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.