मेष : कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्या. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. पैशाचे व्यवहार जपून करा.
वृषभ : महिलांना नवीन वस्तू, दागिने खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल.
मिथुन : काहीतरी भव्यदिव्य करण्याची सुप्त इच्छा राहील. परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जा.
कर्क : व्यवसायात धोरणी राहून कामे संपवा. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील.
सिंह : कामाचा ताण वाढला तरी चिडू नका. महिलांनी हातून चुका होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
कन्या : “हाती घ्याल ते तडीस न्याल’ व्यवसायात काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल.
तूळ : आखलेले आखाडे अचूक येतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल.
वृश्चिक : जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नवीन कामाची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल.
धनू : सुवार्ता कळेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात मान मिळेल.
मकर : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते याची प्रचिती येईल. मनाची एकाग्रता साधता येईल.
कुंभ : व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. नवीन कामे मिळतील. आरोग्यात सुधारणा होईल.
मीन : कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्यक ठरेल. नोकरीत प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवणे फायद्याचे होईल.