आजचे भविष्य ( शनिवार, 24 जुलै 2021)

मेष :आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवता येईल. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळेल.

वृषभ : व्यवसायात महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्याल.

मिथुन : बाजारातील तुमची प्रतिष्ठा वाढवणारे काम हातून घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्चाचे बजेट कोलमडेल.

कर्क : कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे नको त्या कामात बराच वेळ घालवाल. वातावरण आनंदी असेल.

सिंह : मिळालेल्या सुखसुविधा उपभोगण्याचा कल राहील. कामापेक्षा त्याचा बाऊच जास्त कराल.

कन्या : अवतीभवती असलेल्या व्यक्‍तींचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कामाची आखणी कराल.

तूळ : व्यवसायात नेहमीपेक्षा वेगळे काम करण्याकडे कल राहील. घरात तुमच्या मताला मान मिळेल.

वृश्‍चिक : प्रसिद्धी माध्यम व जाहिरातींचा वापर करून पैशाची आवक वाढवण्याचा प्रयत्न कराल.

धनु : कामानिमित्ताने प्रवास घडेल व नवीन ओळखी होतील. नोकरीत केलेल्या कामात यश मिळेल.

मकर : वरिष्ठ कामात मदत करतील. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.

कुंभ : सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करता आल्याने ताण कमी होईल. आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करता येईल.

मीन : सप्ताहात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा मानस राहील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.