Horoscope | आजचे भविष्य (गुरुवार : 22 एप्रिल 2021)

मेष : नोकरीत विविध क्षेत्रातील व्यक्तिंशी संपर्क होईल व त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल.

वृषभ : महिलांचा कामाचा झपाटा वाखणण्याजोगा असेल. सुवार्ता कळेल. प्रगतीचा वेग उत्तम राहील.

मिथुन : नवीन गुंतवणूक करणे गरजेचे होईल. नवीन आवक वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

कर्क : महत्वाची कामे स्वतः करुन इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. मनाप्रमाणे कामे केल्याचा आनंद मिळेल.

सिंह : परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांनी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नयेत.

कन्या : प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थी चिकाटीने ज्ञानार्जन करील व यशही संपादन करतील. धावपळ करु नये.

तूळ : नवविवाहितांना अपत्यसुखाची चाहूल लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नवीन कामे हाती घ्याल.

वृश्‍चिक : व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करुन फायदयाचे प्रमाण वाढवाल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील.

धनू : नोकरीत बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. बढती मिळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील.

मकर : बेकारांना कामधंदा मिळेल. महिलांचा वेळ छंदात मजेत जाईल. जिवाभावाची माणसे भेटल्याने आनंद मिळेल.

कुंभ : विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान. व्यवसायात व नोकरीत लवचिक धोरण ठेवाल. अतिस्पष्टवक्तेपणा टाळावा.

मीन : व्यवसायातील तांत्रिक अडथळे दूर करुन कामे वेळेत बिनचूक पूर्ण कराल. तब्येतीची काळजी घ्यावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.