उत्सुकता भविष्याची: 1 ते 7 ऑक्‍टोबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

अनिता केळकर (लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ) 
अडथळे दूर होतील 
ग्रहांची अनुकूलता मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणेल. व्यवसायात कामातील अडथळे दूर होतील. नवीन कामांना प्रारंभ होईल. नोकरीत विरोधकांचा विरोध मावळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्व कळून येईल. महिलांना कौटुंबिक स्वास्थ मिळेल. हातून कौतुकास्पद काम होईल. आखलेले बेत सफल होतील. खेळाडूंना यश मिळेल. 
शुभ दिनांक : 1, 2, 3, 4, 5, 6, 7 

प्रवास घडेल 
हाती घ्याल ते तडीस न्याल. व्यवसायात तुमची मते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न कराल. हातून चांगली कामे पूर्ण होतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत इतरांना न जमलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. महिलांना स्वत:ची हौसमौज करता येईल. मात्र अनावश्‍यक खर्च टाळावा. सामूहिक कामात सहभागी व्हाल. 
शुभ दिनांक : 1, 2, 3, 4, 5, 6, 7
 

विशेष लाभ होईल 
मनातील ईप्सित साध्य कराल. व्यवसायात नवीन कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण कराल. मनोनिग्रह चांगला राहील. नोकरीत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. नवीन अनुभव येतील. महिलांना कामाचा उरक दांडगा राहील. कृतीवर भर द्याल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. 
शुभ दिनांक : 2, 3, 4, 5, 6, 7 

आनंदवार्ता कळेल. 
नशिब साथ देईल. व्यवसायात नवीन संकल्प हाती घ्याल. कामात बदल करून उलाढाल वाढवाल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. स्वत:चे काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. घरात नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. कुटुंबासमवेत छोटीशी सहल काढाल. आनंदवार्ता कळतील. तरुणांचे विवाह ठरतील. 
शुभ दिनांक : 1, 4, 5, 6, 7 

तडजोडीचे धोरण ठेवा 
जिद्द व चिकाटी या जोरावर अशक्‍य गोष्टी शक्‍य करून दाखवाल. कष्टाशिवाय फळ नाही हे लक्षात येईल. व्यवसायात पैशाची आवक जावक सारखीच राहील. तडजोडीचे धोरण ठेवावे. नोकरीत द्विधा मनस्थिती होईल. त्यामुळे तूर्तास महत्वाचे निर्णय पुढे ढकला. “शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवून कामात गुप्तता राखा. महिलांनी परिस्थिती जुळवून भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून काम करावे. 
शुभ दिनांक : 1, 2, 3, 6, 7 

 


कामात उत्साह 
“मूर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण सार्थ कराल. व्यवसायात कल्पकता दाखवून कामे कराल. नवीन आव्हाने स्वीकाराल. मिळालेल्या वेळेचा व संधीचा योग्य उपयोग कराल. नोकरीत सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. कामातील उत्साह ओसंडून वाहील. महिलांना मनातील बेत प्रत्यक्षात साकार करता येतील. महत्वाचे पद, सामाजिक पद भूषवाल. 
शुभ दिनांक : 1, 2, 3, 4, 5 

आर्थिक स्थिती भक्कम 
व्यवहारी बनून कामे कराल. व्यवसायात कधी गोड तर कधी अधिकाराचा वापर करून कामे मार्गी लावाल. महत्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. पैशाची स्थिती सुधारेल. नोकरीत महत्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठ नवीन गोष्टी शिकण्याची संधी देतील. कल्पकता दाखवून कामे कराल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठी असल्याने दु:ख वाटणार नाही. 
शुभ दिनांक : 2, 3, 4, 5, 6, 7 

कामात समाधान 
“शक्‍तीपेक्षा युक्‍ती श्रेष्ठ’ याची प्रचिती येईल. व्यवसायात दक्ष राहाल. कामाचे योग्य नियोजन करून कामे हातावेगळी कराल. नोकरीत मौनव्रत बाळगणे हिताचे ठरेल. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवाल. महिलांनी वादविवाद टाळून सुसंवाद साधावा. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद होईल. सामूहिक कामात पुढाकार राहील. 
शुभ दिनांक : 1, 4, 5, 6, 7 

आर्थिक चिंता मिटेल 
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकुल आहेत. ते आर्थिक चिंता मिटवतील. व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामे मार्गी लावाल. विरोधकांचा विरोध मावळेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. त्यांनी दिलेली कामे वेळेत पूर्ण करू शकाल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. वरकमाई करता येईल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल. 
शुभ दिनांक : 2, 3, 6, 7 

यश मिळेल 
आत्मविश्‍वास व इच्छाशक्‍ती दांडगी राहील. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी डावपेच आखाल. योग्य वेळी योग्य केलेली कृती यश मिळवून देईल. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्व इतरांना कळेल. तुमच्या कामाने तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घ्याल. घरात महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड न करता खुबीने इतरांकडून कामे करून घ्याल. 
शुभ दिनांक : 1, 4, 5 

जुनी येणी वसूल होतील 
महत्त्वपूर्ण घटना घडतील. व्यवसायात कार्यतत्पर राहावे. खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता भासेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. जुनी येणी वसुल होतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. बेकार व्यक्‍तींना कामधंदा मिळेल. महिलाना मनाजोगता खर्च करता येईल. 
शुभ दिनांक : 1, 2, 3, 6, 7 

कामे मार्गी लागतील मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील
व्यवसायात परिस्थितींशी मिळते जुळते घेऊन कामे मार्गी लावाल. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नोकरीत मोठ्या व्यक्‍तींशी ओळख होतील. भावनेला महत्व द्याल. त्यामुळे हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. महिलांना प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. प्रवास घडेल. 
शुभ दिनांक : 1, 2, 3, 4, 5 

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)