मेष : सलोख्याचे वातावरण राहील. तरूणांना संसारिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल.
वृषभ : व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून पुढे जावे लागेल. पैशाचा अपव्यय होत नाही याची काळजी घ्या.
मिथुन : नोकरीत हितशत्रूंपासून सावध रहा. ऐकीव गोष्टींवर विेशास न ठेवता शहानिशा करून मगच मतं ठरवा.
कर्क : घरात योग्य वाटेल तेच कराल. मानसन्मान व प्रसिद्धीचे योग. चुकीची संगत धरू नका. पैशाची मोह टाळा.
सिंह : वैचारिक बदल तुमचे व्यक्तिमत्व बदलून टाकेल. नवी दिशा जीवन बदलून टाकेल. पैशाची चणचण राहील.
कन्या : संमिश्र फळ देणारे ग्रहमान. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चाकोरीबाहेरचा मार्ग स्विकारावा लागेल.
तूळ : आजचे काम आजच करा म्हणजे वेळेत कामे पूर्ण होतील. नोकरीत कामात आवश्यक तेथे मदत घ्या.
वृश्चिक : मुलांच्या प्रगतीबाबत थोडी चिंता राहील. वादविवादाचे प्रसंग येतील तरी रागांवर नियंत्रण ठेवा.
धनु : हितचिंतकांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. घरात प्रकृतीच्या तक्रारींकडे लक्ष दयावे लागेल.
मकर : घरात नवीन खरेदी कराल. वातावरण प्रसन्न राहील. आशावाद जागृत होईल. कामाचा उत्साह वाढेल.
कुंभ : तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. वरिष्ठांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने कामाला हुरूप येईल.
मीन : अत्यंत धोरणी वागून कामाची आखणी करावी लागेल. स्वयंसिद्ध राहून कामे हातावेगळी करावी लागतील.