आजचे भविष्य (मंगळवार, दि. २९ डिसेंबर २०२०)

मेष : हातातील कामे आधी पूर्ण करा मगच नवीन कामांकडे वळा. घरात मदतीची आवश्‍यकता इतरांना वाटेल.

वृषभ : कामानिमित्ताने प्रवास व नविन ओळखी होतील. घरात आनंदाचे क्षण साजरे होतील.

मिथुन : मनोकामना सफल होतील. महिलांना आवडता छंद जोपासता येईल. वातावरण खेळीमेळीचे राहील.

कर्क : नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागले तरी वाच्यता करु नका. महिलांना अपेक्षित कामाचा उरक पडेल.

सिंह : सहकारी व वरिष्ठ यांची मदत आवश्‍यक तेव्हा येईल. घरात तुमचे सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.

कन्या : व्यवसायात मनाप्रमाणे गोष्टी घडत गेल्याने तुम्ही आनंदी दिसाल. मनोकामना पूर्ण होईल.

तूळ : कामानिमित्ताने प्रवास घडेल. घरात इतर व्यक्तिंची तुमचे मनोधैर्य टिकवून ठेवायला मदत होईल.

वृश्‍चिक : कामात हयगय खपून घेणार नाही. महागडया वस्तूंची खरेदी होईल. तरुणांना गुण दाखवण्यास वाव मिळेल.

धनु : कामात चोखंदळ रहा. सहकारी कामात मदत करतील. नवीन ओळखी होतील. भावनावेग आवरावा.

मकर : कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलती वरिष्ठ देतील त्याचा लाभ घ्या. प्रकृतीमान उत्तम राहील.

कुंभ : नोकरीत वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. अतिश्रम टाळा. कुसंगतीने चुकीची पावले टाकू नका.

मीन : नोकरीत सहकाऱ्यांच्या मतलबी स्वभावामुळे वाईट वाटेल. त्यामुळे कामात तत्पर रहा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.