मेष : ठरविलेले बेत साकार होतील. ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करा. फायद्यासाठी नवा पर्याय.
वृषभ : ग्रहमान साथ देईल, आनंदी राहाल. लाभ होईल. नवीन संधी मिळेल. शुभसमारंभ पार पडतील.
मिथुन : अत्यावश्यक गरजांसाठी खर्च होईल, ताण वाढेल. घरात खरेदीचे बेत ठरतील, ध्येय धोरणे ठरवाल.
कर्क : प्रगती होईल. घरात सुखद प्रसंगाची नांदी होईल. कामाचे समाधान राहील, आनंदी राहाल.
सिंह : सकारात्मक दृष्टीकोन, भविष्यात सफलता. प्रश्न व गैरसमज सांमजस्याने सोडवा.
कन्या : मर्यादा ओळखा, खर्चावर बंधन ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा. इतरांवर काढू नका.
तूळ : प्रकृतीची हेळसांड करू नका, संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल. घरात शुभप्रसंग घडतील.
वृश्चिक : वाद टाळण्याचा प्रयत्न करा, दुर्लक्ष करा. पळत्याच्या मागे लागू नका. योग्य पावले उचला.
धनु : कामात बदलाचा विचार असेल तर प्रयत्न करा. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रतिष्ठा मिळेल.
मकर : सबुरीचे धोरण ठेवा. लाभ होईल. भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नका.नवीन कामांकडे लक्ष द्या.
कुंभ : कामे वेळेत पूर्ण करा. अडीअडचणींवर मात करून प्रगती कराल, फायद्याचे प्रमाण वाढेल.
मीन : व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. योग्य कार्यक्षेत्र निवडले तर फायदा तुमचाच आहे.