आजचे भविष्य (शुक्रवार, दि.२७ नोव्हेंबर २०२०)

मेष : ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवू नका, शहानिशा करा. दृष्टिकोन विशाल ठेवून कामात प्रगती कराल.

वृषभ : उर्मी वाढेल, जोश वाखाणण्यासारखा. नवीन करार करण्यास योग्य ग्रहमान.

मिथुन : कामाच्या नवीन संधी दृष्टिक्षेपात येतील. यश मिळेल, परंतु काही प्रमाणात निराशा जाणवेल.

कर्क : उधारीपेक्षा रोखीवर भर द्यावा लागेल. स्पर्धेत टिकण्यासाठी चौफेर लक्ष ठेवा.

सिंह : बुद्धीच्या जोरावर कामे मिळवाल. कामाच्या पद्धतीत बदलाने नुकसान कमी होईल.

कन्या : चिकाटीमुळे तग धरून राहाल. व्यवसायात फायदा. संधी पाहून काम करा, यश मिळेल.

तूळ : निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल. आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल.

वृश्‍चिक : कामात हुरूप वाढेल. कामात व्यग्र रहाल. कामाचा आनंद मिळेल. चांगली बातमी समजेल.

धनु : पैशाचे गणित कोलमडेल. अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्या.

मकर : अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील. जुनी येणी येतील. अपेक्षा पूर्ण होतील.

कुंभ : वचन पाळाल. पैशाची चिंता मिटेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. कामाचा आवाका वाढेल.

मीन : प्रवास घडेल. आनंदी रहाल. नवीन कामे मिळतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.