आजचे भविष्य (मंगळवार, दि.२६ जानेवारी २०२१)

मेष : पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.

वृषभ : अतिविचार न करता बेधडक निर्णय घेण्याकडे कल राहील. कमी श्रमात जास्त यश मिळवाल.

मिथुन : व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय कराल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे.

कर्क : नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. कामात सुधारणा होईल.

सिंह : घरात तणावाचे वातावरण कमी होईल. सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल. मनासारखे कामं करता येईल.

कन्या : अचूक पारख करून कामे मिळवाल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. आरोग्य मात्र सुधारेल.

तूळ : व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल.

वृश्‍चिक : मनाला पटेल रूचेल तीच कामे करा. नको त्या कामात वेळ जाईल. शब्द हे शस्त्र आहे लक्षात ठेवा.

धनु : जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग, तुमचे विचार परखडपणे मांडाल.

मकर : मतलबी व्यक्‍तींपासून चार हात लांब रहा. भोवतालच्या व्यक्‍तींचा नवीन अनुभव घ्याल.

कुंभ : हाती घेतलेली कामे पूर्णत्वाला आल्याने हायसे वाटेल. व्यवसायात कामात सतर्क रहा.

मीन : अडथळ्यांवर मात करून कामे मार्गी लावाल. पैशाच्या व्यवहारात चोख रहा. कामाची वाच्यता फार नको.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.