आजचे भविष्य (शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०२०)

मेष : घर व व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष दयावे लागेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील.

वृषभ : व्यवसायात नवीन कामे मिळतील. ती स्विकारण्यापूर्वी त्यातील अटी व नियमांचा अभ्यास करा.

मिथुन : सध्या तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा असेल. त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करुन कामे संपवा.

कर्क : सभोवतालच्या व्यक्तिंच्या वागण्याने थोडेसे बुचकळयात पडाल. सबुरी धरल तर प्रश्‍नांची उकल होईल.

सिंह : सुख व समाधान देणारे ग्रहमान लाभत आहे. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल.

कन्या : रवी तुम्हाला तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवेल. नव्या उमेदीने कामाला लागाल.

तूळ : श्रद्धा व सबुरी ठेवलीत तर बरेच काही साध्य करु शकाल. व्यवसायात मनाविरुद्ध वागावे लागेल.

वृश्‍चिक : स्वप्नपूर्तीसाठी कल्पनाविलासात रंगून जाल. पण जमिनीवर पाय घट्‌ट रोवून उभे रहा.

धनु : व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तिंची मिळालेली मदत भविष्यात कार्यविस्तार करण्यासाठी उपयोगी पडेल.

मकर : नशिब साथ देईल. व्यवसायात अनपेक्षित कामे मार्गी लागतील. नवीन कामेही मिळतील.

कुंभ : कामाचे वेळी काम करुन इतर वेळी आराम करण्याकडे कल राहील. अतिचिकित्सक राहू नये.

मीन : सध्या तुमचा आशावाद चांगला असल्याने सकारात्मक दृष्टीकोन राहील. बोलताना तारतम्य बाळगा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.