मेष : जादा सवलती व अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल.
वृषभ : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. उलाढाल वाढेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल.
मिथुन : वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील.
कर्क : पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा.
सिंह : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य करून घ्या.
कन्या : जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. महिलांना मुलांकडे लक्ष द्यावे लागेल.
तूळ : हलके कान न ठेवता प्रत्यक्ष शहानिशा करावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मनन व चिंतन करावे.
वृश्चिक : इतरांचेही विचार जाणून घ्या. घरात स्वतःचेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास धरू नका.
धनु : व्यवसायात उद्दीष्टे डोळयासमोर ठेवून कृती कराल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत अनुभव येतील.
मकर : व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन मार्गी लावा. कामे मिळवण्याचा प्रयत्न राहील.
कुंभ : नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील.
मीन : पैशाची स्थितीही समाधान देणारी राहील. नोकरीत सहकारी कामात मदत करतील.