मेष : रागावर नियंत्रण ठेवलेत तर डोके शांत राहील. महिलांना अध्यात्मिक प्रगती करता येईल.
वृषभ : व्यावसायिक यश वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील.
मिथुन : पूर्वी केलेल्या श्रमाचे चीज होईल. घरात कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. घरात छोटासा कार्यक्रम ठरेल.
कर्क : आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. तरूणांना मनपसंत व्यक्तीची भेट घडेल.
सिंह : घरात काही ठोस निर्णय घ्याल. प्रश्नांची उकल करून ती सामंजस्याने सोडवाल. कौटुंबिक स्वास्थ राहील.
कन्या : नवीन कामे करण्यात उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी झाल्याने चार पैसे हातात शिल्लक राहतील.
तूळ : जाहिरात, प्रसिद्धीमाध्यम यांमुळे कामाचा विस्तार होईल. कामाचे नियोजन करून पावले उचला.
वृश्चिक : पैशाची आवक वाढेल. घरात मुलांकडून अपेक्षित प्रगती कळेल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.
धनु : नोकरीत महत्त्वाच्या कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील. कमी श्रमात जास्त यश मिळेल.
मकर : महिलांनी फार मोठे बेत आखू नयेत. व्यवसायात काहीतरी चांगले करण्याचा आत्मविश्वास वाटेल.
कुंभ : व्यवहारात चोख राहा. गोड बोलण्याचा प्रयत्न करा व खुबीने कामे करून घ्या.
मीन : नवीन नोकरीत मात्र काही निर्णय घाईने घ्यावे लागतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल.