आजचे भविष्य (शुक्रवार, दि.२० नोव्हेंबर २०२०)

मेष : ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

वृषभ : पैशाची तजवीज होईल. नोकरीत कोणत्याही कामात बेफिकीर राहू नका.

मिथुन : आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. गृहसौख्याचा आनंद मिळेल.

कर्क : मनाविरुद्ध वागावे लागले तरी चिडू नका. अध्यात्मिक प्रगती साधता येईल.

सिंह : नोकरीत योग्य व्यक्‍तिंची साथ मिळेल. मनातील इच्छा आकांक्षा सफल होतील. जुनी वसुली होईल.

कन्या : दगदग, धावपळ होईल. आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत वरिष्ठांच्या सूचना पाळाव्या लागतील.

तूळ : नोकरीत सभोवतालच्या व्यक्तिंकडून नवीन अनुभव येईल. कामात गुप्तता राखा. प्रकृतीकडे लक्ष द्या.

वृश्‍चिक : घरात अनपेक्षित खर्च वाढतील. मनाविरुद्ध वागावे लागेल. मात्र रागाच्या भरात कुसंगत धरू नका.

धनु : नवीन गुंतवणूक कराल. नोकरीत मोठया कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. अधिकारही देतील.

मकर : घरात महिलांना मनाप्रमाणे वागता येईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांनी- संयमाने वागावे.

कुंभ : वरिष्ठांची एखादी गोष्ट जरी पटली नाही तरी विरोध करू नका. दुर्लक्ष करा.

मीन : तरुणांचे विवाह जमतील. प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत हलके कान न ठेवता तारतम्य बाळगावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.