मेष : व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.
वृषभ : विरोधकांचा विरोध मावळेल व तुमच्या कलात उचलून धरतील. कामानिमित्ताने हितसंबंध जोडले जातील.
मिथुन : किचकट कामे हातावेगळी कराल. घरात तुमचे विचार इतरांना पटतील. सहमती मिळेल. सुवार्ता कळेल.
कर्क : कामात यश मिळाल्याने उत्साह व जोम राहील. महिलांना मानसिक समाधान मिळेल.
सिंह : तुमचे सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात पूर्वी योजून घेतलेल्या निर्णयाचा लाभ होईल.
कन्या : आर्थिक व इतर बाबतीत झालेली कुचंबणा कमी होईल. नवीन कामे मिळाल्याने तुमची उमेद वाढेल.
तूळ : नोकरीत नवीन आव्हाने पेलावी लागतील. पैशाची स्थिती थोडी नाजूकच राहील.
वृश्चिक : बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. घरात तुमचे धोरण लवचिक ठेवा.
धनु : खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होईल. आनंदाचा सोहळा साजरा कराल.तरुणांना हुरुप येईल.
मकर : महिलांना कौतुकाची थाप मिळेल. बराच काळ तुमची झालेली गैरसोय कमी होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
कुंभ : व्यवसायात अडचणींवर मात करुन प्रगती कराल.ोग्य व्यक्तिंचे मिळालेले सहकार्य तुमचा ताण कमी करेल.
मीन : अस्थिरताही कमी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. देणी देता आल्याने जमा खर्च सारखाच राहील.