आजचे भविष्य (शनिवार, दि.१४ नोव्हेंबर २०२०)

मेष : नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ : स्वयंसिद्ध राहून कामे उरकावीत. नोकरीत कितीही कामे केले तरी समाधान नसेल.

मिथुन : त्यामुळे निराशा होईल. परंतु कामात मग्न रहा. अनपेक्षित चांगली वार्ता कळेल.

कर्क : आवडत्या व्यक्‍तिंच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान लाभेल.

सिंह : कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.

कन्या : चांगल्या घडामोडी घडतील. कामात प्रगती चांगली होईल.

तूळ : हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामांकडे लक्ष दया. महत्वाच्या कामांना गती मिळेल.

वृश्‍चिक : नोकरीत चांगली घटना तुमचे लक्ष वेधेल. वरिष्ठ दिलेले आश्‍वासन पाळतील. प्रवास योग.

धनु : व्यवसायात पैशाची आवक चांगली राहील. जुनी येणीही वसूल होतील. नवीन कामे मिळतील.

मकर : व्यवसायात अडथळे येतील. परंतु निराश न होता अथक श्रमाने यश संपादन कराल.

कुंभ : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल.

मीन : घरात आनंद देणारी चांगली घटना घडेल. तरूणांचा उत्साह वाढेल. प्रकृतीमान सुधारेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.