आजचे भविष्य (शुक्रवार, दि.१३ नोव्हेंबर २०२०)

मेष : जुनी वसुली होईल. मात्र ती करताना इतरांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.

वृषभ : तरीही सकारात्मक दृष्टिकोन राहील. सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे येतील.

मिथुन : मनाजोगती कामे होतील. घरात मुलांच्या प्रगतीबाबत बातमी कळेल. कामाचा उरक दांडगा असेल.

कर्क : ग्रहमान अनुकूल राहील. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण कराल.

सिंह : नोकरीत योग्य व्यकिंतची साथ मिळेल. मनातील इच्छा आकांक्षा सफल होतील.

न्या : कामाचा उरक दांडगा राहील. त्यामुळे दगदग, धावपळ होईल. आर्थिक चिंता मिटेल.

तूळ : नोकरीत सभोवतालच्या व्यक्‍तिंकडून नवीन अनुभव येईल. कामात गुप्तता राखा.

वृश्‍चिक : घरात शुभ कार्य ठरतील. समारंभासाठी पैशाची तजवीज करावी लागेल.

धनु : प्रगतीसाठी नवीन गुंतवणूक कराल. नोकरीत मोठया कामासाठी वरिष्ठ तुमची निवड करतील.

मकर : पैसे व वेळ यांची योग्य सांगड घालून कामाचे नियोजन केले तर लाभ होईल.

कुंभ : कल्पनेला वास्तवतेची जोड मिळेल. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील. तरुणांचे विवाह ठरतील.

मीन : विद्यार्थ्यांना अभ्यासाला पोषक वातावरण मिळेल. ग्रहांची साथ मिळेल. कामाचा वेग उत्तम राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.