आजचे भविष्य (गुरुवार, दि.१२ नोव्हेंबर २०२०)

मेष : कामात आवश्‍यक ते बदल करून उलाढाल वाढवण्याचा विशेष प्रयत्न राहील.

वृषभ : विरोधकांवर मात करून पुढे मार्गक्रमण कराल. व्यवसायात म्हणावी तशी साथ नसेल.

मिथुन : नोकरीत ऐकावे जनाचे करावे मनाचे, या मंत्राचा उपयोग होईल. सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल.

कर्क : उलाढाल वाढेल. तसेच जुनी येणी वसूल होतील. मानसिक शांतता मिळेल.

सिंह : जुनी वसुली होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात वातावरण चांगले राहील.

कन्या : नोकरीत वरिष्ठांच्या सूचना पाळाव्या लागतील. त्यामुळे चिडचिड होईल.

तूळ : विचारांची मांडणी योग्य हाताळा. अंथरुण पाहून पाय पसरा. कर्ज काढून गृहसजावट करू नये.

वृश्‍चिक : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता टिकवावी.

धनु : जोडधंद्यातून लाभ होईल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. रागांवर नियंत्रण ठेवा.

मकर : नोकरीत वरिष्ठांच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करा. भावनेच्या भरात उधार उसनवारी टाळावी.

कुंभ : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. फायदा मिळवून देणाऱ्या कामांकडे लक्ष दयाल.

मीन : व्यवसायात नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.