मेष : प्रवासाचे योग येतील. पाहुणे येतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : उधार उसनवार वसूल होईल. मुलांकडून अपेक्षित यश मिळेल. कामात प्रतिष्ठा मिळेल. वरिष्ठ खूष होतील.
मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. कामे यशस्वी होतील. सकारात्मक बदल होईल. आनंदी राहाल.
कर्क : आर्थिक लाभ होईल. जिद्द चिकाटीने कार्यरत रहाल. उधार उसनवारी वसुल होईल. प्रवास सुखकर होईल.
सिंह : अनेकांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढेल.पैशाची चिंता मिटेल. कामाचा कंटाळा येईल.
कन्या : छंदात वेळ घालवाल. रागावर नियंत्रण ठेवा. पथ्यपाणी सांभाळा. अतिविश्वास टाळा. पाहुणे येतील.
तूळ : जोडधंद्यात विशेष फायदा. अर्धवट कामे पूर्ण होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. अनपेक्षित लाभ.
वृश्चिक : जादा सवलती व अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल.
धनु : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. उलाढाल वाढेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल.
मकर : वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल. मनाप्रमाणे कामे करता येतील.
कुंभ : पैशाची कुवत ओळखून कामाची आखणी करा. पैशाच्या हव्यासापायी कुसंगत टाळा.
मीन : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. तुमच्या मागण्या मूड पाहून मांडा व मान्य करून घ्या.