-->

आजचे भविष्य (मंगळवार, दि.९ फेब्रुवारी २०२१)

मेष : प्रगतीला पूरक ग्रहमान लाभल्याने कामाचा आलेख चढता राहील. आर्थिक स्थितीही समाधानकारक असेल.

वृषभ : व्यवहारात पुढाकार घेऊन कामे मार्गी लावा. योग्य व्यक्‍तींची मिळालेली साथं उपयोगी पडेल.

मिथुन : नोकरीत पूर्वी गमावलेल्या संधीचा लाभ घेता येईल. बदली किंवा कामात बदल होण्याची शक्‍यता.

कर्क : वरिष्ठ व नवीन कामे मिळतील. सहकारी मदत करतील. घरात सुवार्ता कळेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.

सिंह : मानसिक आरोग्य चांगले राहील. कुवत ओळखून पुढे जा. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. प्रवासयोग.

कन्या : व्यवसायात कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याचा पडताळा घ्या. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील.

तूळ : बोलण्यामुळे इतरांची मने दुखावणार नाहीत याची खबरदारी घ्या. घरात ताणतणाव कमी होईल.

वृश्‍चिक : नोकरीत वरिष्ठ व सहकारी मतलबासाठी खुशामत करतील तरी सावधगिरी बाळगा. कामात गुप्तता राखा.

धनु : मनाविरुद्ध काम करावे लागले तरी वाच्यता करू नका. घरात खर्च वाढतील. पैशाची तजवीजही होईल.

मकर : इतर व्यक्‍तींच्या मागण्या पुरवाव्या लागतील. मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण तुमचेबाबतीत सार्थ ठरेल.

कुंभ : जसा मनात विचार कराल तशीच फळे मिळतील. व्यवसायात कामांना वेग येईल. कामे होतील.

मीन : इप्सित साध्य करू शकाल. वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्या. बेकार व्यक्‍तीना कामधंदा मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.