-->

आजचे भविष्य (सोमवार, दि.८ फेब्रुवारी २०२१)

मेष : मनावर संयम ठेवून वागा यश हमखास मिळेल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी परिश्रम पडतील.

वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तिंचा सल्ला उपयोगी पडेल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल.

मिथुन : पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल करून उरक पाडाल.

कर्क : मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. कामातील बेत गुप्त राखा. घरात अनावश्‍यक खर्चाला फाटा द्या.

सिंह : कामाची योग्य आखणी करून वेळ व पैसा वाचवा. तरूणांकडून चांगली बातमी कळेल.

कन्या : शनीचे वास्तव्य सजगता वाढवणारे आहे. त्यामुळे हळूहळू प्रगती होईल. घरात शुभकार्ये ठरतील

तूळ : व्यवसायात दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. योजना हाती घेण्यास योग्य कालावधी आहे.

वृश्‍चिक : अडचणी अडथळयांवर मात करून यश मिळवण्याचा विशेष प्रयत्न राहील. कामात सहकारी मदत करतील.

धनु : कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. जोडधंदयातून विशेष लाभ होईल. वातावरण आनंदी राहील.

मकर : नातेवाईक मित्रमंडळी यांच्या भेटीचे योग येतील. कमी श्रमात जास्त यश मिळेल. निर्णय अचूक ठरतील.

कुंभ : चांगली घटना घडेल. महत्वाकांक्षा वाढेल. फायद्याचे प्रमाण वाढल्याने पैशाची ऊब मिळेल.

मीन : नोकरीत पूर्वी काही कारणाने हुकलेली संधी पुन्हा मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची भिस्त तुमचेवर राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.