-->

आजचे भविष्य (गुरुवार, दि.४ फेब्रुवारी २०२१)

मेष : “स्वतः मेल्याशिवाय …” या म्हणीची आठवण पदोपदी होईल प्रत्येक कामात स्वयंसिद्‌ध व्हावे लागेल.

वृषभ : व्यवसायात वेळ व काळ यांचे तारतम्य बाळगा. काही कामे दुसऱ्यावर विसंबून असतील तर विलंब होईल.

मिथुन : नोकरीत बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. वरिष्ठांची खुशामत करा. खर्च वाढेल.

कर्क : घरात अनपेक्षित खर्च वाढेल. करमवणूकीत वेळ घालवाल. रूसवे फुगवे प्रेमात अनुभवता येतील.

सिंह : महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. मनोराज्ये पूर्ण करण्यास सुकाळ आहे. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा.

कन्या : अंथरूण पाहून पाय पसरलेत तर जास्त लाभदायी ठरेल. व्यवसायात रेंगाळलेली कामे तडीस न्या.

तूळ : नोकरीत कामाचा ताण वाढेल. हितचिंतक व सहकाऱ्यांची कामात मदत होईल. पैशाची चिंता मिटेल.

वृश्‍चिक : घरात वादविवाद होतील. तुमचे निर्णय तुम्ही इतरांवर लादाल. कौटुंबिक जीवनात अस्थिरता येईल.

धनु : प्रकृतीचीही काळजी घ्या. तरूणांनी आवाक्‍याबाहेर जाऊन कामे करू नयेत. तरूणांचे विवाह ठरतील.

मकर : कामाचा आनंद मिळाल्याने कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. स्पर्धकांच्या पुढे एक पाऊल टाकाल.

कुंभ : नोकरीत आता दगदग धावपळ वाढली तरी भविष्यात त्याचा लाभ होईल. तुमची किंमत इतरांना कळेल.

मीन : सगळयांबरोबर काम केलेत तर यशही मिळेल. योग्य व्यक्तिंची संगत बरेच काही साध्य करून देईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.