मेष : आत्मिक बळ वाढेल. व्यवसायात अवघड कामात यश मिळेल. महत्वाकांक्षी योजना सफल होतील.
वृषभ : नवचैतन्य सळसळेल. कामात उत्पादन व नफा वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कराल.
मिथुन : नोकरीत कमी श्रमात यश मिळवण्याचा प्रयत्न राहील. जोडधंद्यातून कमाई होईल. भरपूर काम करा.
कर्क : घरात महिलांना नवीन खरेदीचा आनंद मिळेल. प्रियजन नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल.
सिंह : केलेल्या श्रमाचे चीज होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विवाह जमतील. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.
कन्या : व्यवसायात बराच काळ मनात रेंगाळत असलेले बेत साकार करण्याची संधी चालून येईल.
तूळ : दूरदृष्टी ठेवून केलेली गुंतवणूक उपयोगी पडेल. योग्य माणसांशी संपर्क साधून कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत केलेल्या कामात यश मिळेल. सहकाऱ्यांचा पाठिंबा राहील.
धनु : कामे संपवून इतर वेळ कुटुंबासमवेत घालवाल. व्यवहारी दृष्टीकोनाचा फायदा घरातील इतरांनाही व्हावा.
मकर : ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या म्हणीची प्रचिती येईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
कुंभ : मानसिक अस्वस्थता कमी होऊन तुम्ही पुन्हा तुमच्या कार्यक्षेत्राकडे लक्ष देऊ शकाल. खर्चही भरपूर कराल.
मीन : व्यवसायात बरेचसे प्रश्न सुटतील. स्पर्धकांवर मात करण्यासाठी आखलेली योजना फलदायी ठरेल.