आजचे भविष्य (शुक्रवार, दि. १ जानेवारी २०२१)

मेष : तुमच्या उत्साही स्वभावात पूरक ग्रहमान लाभेल. नोकरीत स्पर्धेत सहभागी व्हाल व यश मिळवाल.

वृषभ : कामात ठोस पावले उचलाल. व्यवसायात पैशाची जुळवाजुळव कराल. महिलांनी शांत चित्त ठेवावे.

मिथुन : सहज सोप्या वाटणाऱ्या कामात अडथळे येतील. तेव्हा गाफील राहू नका. महिलांची मनोकामना पूर्ण होईल.

कर्क : मनी जे ठरवाल ते पूर्णत्वाला नेण्याचा ठाम निश्‍चय कराल. त्यात यशही येईल.

सिंह : सभोवतालच्या परिस्थितीनुरूप बदल कराल. व्यवसायात माणसांची पारख महत्वाची राहील.

कन्या : पैशाची ऊब मिळाल्याने मनातील सुप्त इच्छा आकांक्षा सफल होतील. महिलांना खरेदीचा आनंद घेता येईल.

तूळ : तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचे कर्तुत्व दाखवता येईल. व्यवसायात स्पर्धा तीव्र असेल तेव्हा सावध रहा.

वृश्‍चिक : एखादा निर्णय घाईने घेऊन नंतर उगीचच घेतला अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. थोडी सबुरी ठेवा.

धनु : आशावाद जागृत ठेवून प्रगती कराल. व्यवसायात पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळेल.

मकर : कामात अडथळे येत होते त्यात सुधारणा होईल; मात्र ताबडतोब कामे पूर्ण होतील ही अपेक्षा नको.

कुंभ : हातातील संधीचा पुरेपूर फायदा घ्याल. ग्रहांची साथ राहील. व्यवसायात मनोकामना पूर्ण होतील.

मीन : ग्रहमान तुम्हाला उत्तेजित करणारे आहे. तुमच्या आग्रही स्वभावाला वातावरणाची पूरक साथं मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.