मुंबई – सध्या देशभरात कुणीही जय श्रीराम च्या नावाखाली दलित आणि अल्पसंख्यांकांना धमकावत असल्याच्या घटना घडता आहेत. तसेच सामूहिक हत्यांच्या (मॉब लीचिंग) वाढत्या घटनांच्या विरोधात धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे मॉब लीचिंगच्या निषेधात बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ४९ व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.
याच पार्श्वभूमीवर दम मारो दम या सदाबहार गाण्याला पुन्हा एकदा गाण्याची अनुमती आशा भोसले यांनी ट्विट करत रसिक-प्रेक्षकांना मागितली आहे. आशा ताईंनी ट्विट केले आहे की,’ दम मारो दम, बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम हे सदाबहार गाणे गाऊ की नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मात्र ट्विटवर त्यांना युजर्सने चांगलेच गंमतीशीर उत्तरे दिली आहे.
Dum Maro Dum…Bolo Subh Shyam Hare Krishna Hare Ram..can I perform this evergreen song or not ? ???
— ashabhosle (@ashabhosle) July 26, 2019
आशा ताईंनी मराठी व हिंदीसहित बंगाली, गुजराती, पंजाबी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रुस या भाषेतही अनेक गाणी गायली आहेत