जुन्नरच्या पूर्व भागात हुडहुडी वाढली

बेल्हे -जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे.मागील आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली होती. थंडी वाढल्याने रब्बी पिकाला चांगलाच फायदा होत आहे.ज्वारी, हरभरा पिके थंडीने बहरली आहेत. वाढत्या थंडीने सकाळी सकाळी ठीक ठिकाणी शेकोटी पेटताना दिसत आहे.

थंडी वाढल्याने अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून ऊब घेतली जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. दूध विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेता यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीने सकाळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येऊ लागला आहे. ऊसतोड कामगारांना उपजीविकेसाठी थंडीमध्ये ऊस तोडणी करावी लागत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here