नवी दिल्ली – नौदलात नेतृत्व, व्यावसायिक कामगिरी आणि उच्च अधिकारी, विशेष सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी नवी दिल्लीतील “आयएनएस’- इंडिया येथे आज एक विशेष मानवंदना सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नौदल प्रमुख, ऍडमिरल करमवीर सिंग यांनी नौदलात विशेष सेवा पारितोषिके मिळविणाऱ्या या वर्षीच्या कर्मचाऱ्यांची यादी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जाहीर केली होती. एक युद्धसेवा पदक, एक नौसेना पदक (कर्तव्यनिष्ठता) आणि 6 विशिष्ट सेवा पदके (दीर्घ प्रशंसनीय सेवा) यांसह 8 पदके यावेळी देण्यात आली.
भारतीय नौदलाच्या पारंपरिक पद्धतीनुसार समारंभपूर्व नौदलाच्या कवायतीने सर्व विजेत्यांना मानवंदना देण्यात येते; परंतु सध्याची साथीची परिस्थिती लक्षात घेता नौदलाच्या प्रत्येक स्थानिक विभागात हा मानवंदना समारंभ संपन्न झाला.
या पुरस्कार समारंभाला मर्यादित संख्येत नौदलातील उच्चपदस्थ अधिकारी आणि पुरस्कार विजेत्यांचे निकटचे नातेवाईक उपस्थित होते. समारंभ साधेपणाने परंतु पुरस्कार विजेत्यांना संस्मरणीय ठरेल अशा पद्धतीने साजरा झाला.