अलिबाग : रायगड जिल्ह्यात समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान पेझारी यांच्या वतीने देण्यात येणारे प्रतिष्ठेचे गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे सन्मान पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.
मंगळवार दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता अलिबाग तालुक्यातील श्रीदत्त मंदिर सभागृह पेझारी येथे गुरुवर्य सुभानराव राणे यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित गुरूवर्य सुभानराव राणे सन्मान सोहळ्यात परमपूज्य रंजन पंतबाळेकुंद्री यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सोमवार ११ एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील सन्मान पुरस्कार्थींच्या नावांची घोषणा श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी केली आहे.
या सन्मान सोहळ्यात शर्विका म्हात्रे (बालगिर्यारोहक), रूद्राक्षी टेमकर (जलतरणपटू), मनश्री शेडगे( हाॅकीपटू), रूची भगत (दिवाणी न्यायाधीश), प्रतिक जुईकर(प्रशासकीय अधिकारी), तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील डाॅ. विक्रमजीत पडोळे, डाॅ.श्रीकृष्ण हिवरे, तृप्ती म्हात्रे, अनुजा घरत, उत्कर्षा पाटील, हर्षदा म्हात्रे, जे.जे.रुग्णालय मुंबई येथील निलम पाटील, आरोग्य उपकेंद्र शिहू येथील श्यामला शेळके या सर्वांचा कोरोना योध्दा, लक्ष्मीनगर रहिवासी सामाजिक व सांस्कृतिक मंडळ आंबेपूर-पेझारी यांचा सांस्कृतिक पुरस्काराने, संतोष जुईकर (निवृत्त सैनिक), जितेंद्रकुमार पाटील व शिल्पा काकडे (नाट्यक्षेत्र), मनोज भगत (सायकलपटू), प्रमोद राऊत व संजय कृष्णा पाटील (उद्योजक), जयकुमार पाटील, जीवीता पाटील व भालचंद्र वर्तक (सामाजिक क्षेत्र), सतिश भगत व सुभाष मोकल (आदर्श शिक्षक), बाळासाहेब कसाळे, राजेंद्र काळे व विश्वनाथ पाडावे (अध्यात्मिक क्षेत्र), स्व. जनार्दन दळवी व स्व. मोरेश्वर घारे (मरणोत्तर सामाजिक) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पेझारी गावात अंत्यविधीच्या वेळी मदत करणाऱ्या देवदूतांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी खासदार अरविंद सावंत, माजी आमदार पंडितशेठ पाटील, आस्वाद पाटील, भावना पाटील, चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील, रघुजीराजे आंग्रे, भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर, पंडित अरूणबुवा कारेकर, परमपूज्य अभिजित पंतबाळेकुंद्री, सखाराम पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.