मानधनातील महिलाराज

सिनेसृष्टीतील नायकांपेक्षा नायिकांना कमी मानधन दिले जाते हा विषय मध्यंतरी चांगलाच गाजला होता. बॉलीवूडमधील काही आघाडीच्या नायिकांनी याविषयी स्पष्ट शब्दांत नाराजीही दर्शवली होती. तथापि, काही वेळा अभिनेत्रींना सहकलाकार अभिनेत्यापेक्षा जास्त मानधनही मिळाल्याची उदाहरणे आहेत. सध्या बॉलीवूडमधील आघाडीच्या नायिकांच्या मानधनाची चर्चा चांगलीच रंगली आहे. पाहूया कोणत्या नायिका किती मानधन घेतात ते!

कंगना राणावत : बॉलीवूडमधील अभिनेत्रींच्या योगदानाविषयी सातत्याने बोलणाऱ्या, भूमिका मांडणाऱ्या कंगना राणावतला तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक “थलाइवी’ या चित्रपटासाठी 24 कोटी रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे समजते. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी हे मानधन देण्यात येणार आहे. सध्या नायिकांना मिळत असलेल्या मानधनातील हा उच्चांक असल्याचे मानले जात आहे.

दीपिका पादुकोण : कंगना खालोखाल मानधनाच्या यादीत दुसरे नाव आहे ते दीपिकाचे. दीपिका 21 कोटी रुपयांपर्यंत मानधन आकारते म्हणे! “पद्मावत’ या चित्रपटासाठी तिने 13 कोटी रुपये घेतल्याचे सांगितले जाते.

करिना कपूर : बॉलीवूडची बेबो आणि एकेकाळची सुपरस्टार करिना कपूर सध्या एका चित्रपटासाठी 17 कोटी रुपये मानधन आकारते. गतवर्षी आलेल्या “वीरे दी वेडिंग’ या चित्रपटासाठी करीनाने 10 कोटी रुपये घेतले होते.
याखेरीज श्रद्धा कपूर 15 कोटी रुपये, प्रियांका चोप्रा 18 कोटी रुपये आणि कॅटरीना 12 कोटी रुपये अशी ही क्रमवारी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)