शिक्रापूर- भारतीय माजी सैनिक संघ शिरूर तालुका वर्धापन दिन व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांत वीर पत्नींचा सन्मान सोहळा पार पडला.
हा कार्यक्रम जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शिरूर तालुका माजी सैनिक संघाचे उपाध्यक्ष शामराव धुमाळ, कार्याध्यक्ष पांडुरंग ताथवडे, बाळासाहेब नवले, सुरेश उमाप, परशुराम शिंदे, बंडू कोहोकडे, चंद्रकांत लांडगे, लहू तळोले, एकनाथ महाजन, विलास शिवले, जयसिंग गायकवाड, आनंदराव ढमढेरे, सुरेश ढमढेरे, शिवाजी कोहाकडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, माजी सरपंच राहुल गव्हाणे, शहाजी धुमाळ, साहेबराव खळदकर, डॉ. पार्वती कदम यांसह आदी उपस्थित होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व छत्रपती शिवाजी महाराजारांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी तळेगाव ढमढेरे विद्यालयाच्या मुलींनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले, तर श्रीमती शालनताई ज्ञानोबा मोरे, श्रीमती मीरा माणिक मुरादे, श्रीमती सुगंधाबाई ज्ञानोबा पवार, श्रीमती कल्पना सुभाष बगाटे या वीर पत्नींचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच यावेळी माजी सैनिक संघटनांच्या पुस्तक व कालनिर्णयचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी माजी सैनिक संघटनेची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक मानद सचिव बाळासाहेब नवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरूर तालुका माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष शामराव धुमाळ यांनी केले. कार्याध्यक्ष सुरेश उमाप यांनी आभार मानले.