माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा सन्मान

वेल्हे – माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना पद्मश्री खासदार विकास महात्मे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन “बाबा आमटे प्रेरणा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वेल्हे येथील लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालयात रविवारी (दि.2) महाराष्ट्र पत्रकार संघाचे 16 वे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात राज्यभरातील विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नामवंतांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांना “दादासाहेब फाळके इंटरनशनल एक्‍सलन्स वॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

राज्यभरातून आलेले प्रिंट व इलेक्‍ट्रॉनिक मिडियातील शेकडो पत्रकार अधिवेशनास उपस्थित होते. राज्यभरातील मान्यवरांची उपस्थितीही अधिवेशनाचे खास वैशिष्ठ्य ठरले. राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात उपस्थित पत्रकारांनी मनोगत सादर केले. कार्यक्रमाचे संयोजन पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.किरण जाधव व वेल्हे तालुकाध्यक्ष स्वाती कोळी यांनी केले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल बांदल, पुणे शहराध्यक्ष कृष्णा देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख योगी राजुनाथ, जिल्हा सदस्य संदीप कुंभार, उपाध्यक्ष विलास बांदल, सचिव राजेंद्र खुळे, कोषाध्यक्ष गणेश चिकणे, कार्याध्यक्ष शंकर ढेबे, गोविंद मुळे, हरिप्रसाद सवणे, अमर बनसोडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.