पोलादी स्ञी’ अशी ओळख असलेल्या होसझूने जिंकले विक्रमी ६० वे सुवर्ण

ग्लासगो : जगभरात ‘पोलादी स्ञी’ ( आयरन लेडी) अशी ओळख असलेली हंगेरीची कॅटिन्का होसझू हिने वयाच्या ३० व्या वर्षी अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. होसझू हिने युरोपियन शाॅर्ट कोर्स अंजिक्यपद जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

होसझूने ४०० मी. मिडलेत (जलतरण स्पर्धा) ४ मिनिटे २५.१० सेंकद वेळ नोंदवत सुवर्णविजेती कामगिरी केली. या सुवर्णपदकासह तिने आपल्या ६० व्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची नोंद केली असून तिची आंतरराष्ट्रीय पदकांची एकूण संख्या ९० वर पोहचली आहे.

टोकियो आॅलिंपिकसाठी विना प्रशिक्षक तयारी करत असलेल्या कॅटिन्का होसझूने आपले पहिले पदक १५ वर्षापूर्वी (साल २००४ मध्ये) विएना मध्ये जिंकले होते. होसझूच्या खात्यातील ६० सुवर्णपदकांत ३ आॅलिंपिक सुवर्ण, २६ जागतिक सुवर्ण आणि ३१ युरोपियन सुवर्णपदकांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)