Hong Kong Sixes Live Streaming: हाँगकाँग सिक्स 2024 चा तिसरा आणि शेवटचा दिवस रविवारी आहे, जिथे उपांत्य आणि अंतिम सामने खेळले जातील. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी हाँगकाँग सिक्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता तर दुसऱ्या सामन्यात यूएईकडून पराभव पत्करावा लागल्याने भारत विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले होता.
या स्पर्धेचे जेतेपदाचे सामने उद्या म्हणजेच रविवार, 3 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तर, जाणून घेऊया तुम्ही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहू शकता याबाबत…
हाँगकाँग सिक्स 2024 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना भारतात सकाळी 10.35 पासून थेट पाहता येणार आहे. दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हा सामना सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. दुपारी 2.15 पासून विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. भारतीय चाहत्यांना हा सामना टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येईल.
Hong Kong Sixes 2024 : युएईनं केला मोठा उलटफेर, भारताचा अवघ्या 1 धावेनं केला पराभव…
हे सामनेे तुम्हाला भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क्स टीव्ही चॅनेलवर थेट पाहता येतील. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे सामने पाहण्यासाठी, तुम्हाला FanCode च्या ॲप आणि वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय, हे सामने हाँगकाँग सिक्सच्या अधिकृत वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केले जातील, परंतु ही सुविधा भारतात उपलब्ध नसेल.